Home महाराष्ट्र हिराचंद ब्राम्हणे यांच्या स्मृती निमित्ताने स्मृतिगंध चे प्रकाशन 

हिराचंद ब्राम्हणे यांच्या स्मृती निमित्ताने स्मृतिगंध चे प्रकाशन 

146

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहिल्यानगर(दि.27मार्च):- अहिल्यानगर जिल्हातील ज्येष्ठ साहित्यिक,प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांचे स्नेही, सहकारी, विद्यार्थी यांनी लिहिलेल्या आठवणींच्या “ स्मृतिगंध “ लेखसंग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वा. संकल्प सांस्कृतिक भवन,लोणी खुर्द येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती राहाता पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष ब्राह्मणे यांनी दिली. 

       ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय राठी, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स प्रा.डॉ. गजानन शेपाळ, दै.सार्वमत चे संपादक अशोकराव गाडेकर,भारत सरकारचे नोटरी अड. अनिल काळे, कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर, पदमश्री कृषी परिषदेचे कार्याध्यक्ष गुणवंत आठरे, बेलापूर कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब पवार,ज्येष्ठ साहित्यिक, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे. 

      स्व.हिराचंद ब्राह्मणे सर जाऊन एक वर्ष झालेले असून लेखक, शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक म्हणून ते सर्वत्र परिचित होते. त्यांचे शिक्षण व साहित्य क्षेत्रातील विद्यार्थी,शिक्षक सहकारी, स्नेही असणाऱ्या अनेकांनी लेख लिहून सरांना आदरांजली अर्पण केलेली आहे. “ स्मृतिगंध “ लेखसंग्रहाचे संपादन शब्दगंध चे सुनील गोसावी यांनी केले आहे.

सरांच्या नावाने राहाता तालुक्यातील एका उत्कृष्ट साहित्यिकाला गौरविण्यात येणार असून ज्या ज्या शाळेमध्ये ते कार्यरत होते,तेथील दहावी बारावीतील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.हिराचंद ब्राह्मणे सर ज्या क्षेत्रात कार्यरत होते त्या क्षेत्राशी संलग्न कार्यक्रम त्यांच्या स्मृतीनिमित्त ठेवण्यात येत असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.