

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.14मार्च):-आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने भारत देशामध्ये घरगुती गॅसचा तुटवडा भासू नये,नागरिकांची घरगुती गॅस सिलेंडर साठी होऊ नये यासाठी हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा अवैध वापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी येथील तहसील प्रशासनाने जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या आदेशाने बऱ्याच काळानंतर खडबडून जागे होत (दिनांक १३ मार्च शुक्रवार) रोजी कारवाई करत शहरातील २७ हॉटेलवर अचानक धाड टाकली.या कारवाईदरम्यान व्यावसायिक वापरासाठी बेकायदेशीररीत्या वापरले जात असलेले घरगुती गॅस सिलेंडर प्रशासनाने जप्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार,घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर शहरातील हॉटेल व्यावसायिक सर्रासपणे खुलेआम घरगुती वापराचे गॅस सिलेंडर आपले हॉटेल व्यावसायिक कामासाठी वापरले जात असल्याची तक्रार शहरातील अक्षय गॅस एजन्सीच्या वतीने तहसील प्रशासनाकडे करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाने खडबडून जागे होत बऱ्याच कालखंडानंतर भरारी पथक तयार करून अचानक तपासणी मोहीम राबवून संबंधित हॉटेलवर धाड टाकली.या कारवाईत एकूण सहा हॉटेल मधून दहा घरगुती गॅस सिलेंडर जप्त करून अक्षय गॅस एजन्सी यांच्याकडे सुपूर्दनाम्यावर ताब्यात देण्यात आले आहे संबंधित हॉटेल चालकांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल व तपासणी मोहीम पुढेही राबविण्यात येईल असा इशारा तहसील प्रशासनाने दिला आहे.
ही कार्यवाही जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या आदेशाने जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे,उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर,तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे,पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, स.पो.नि.आदित्य लोणीकर यांनी कार्यवाही केली त्यांना पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रितमकुमार डोडल,मंडळ अधिकारी शंकर राठोड,महसूल सहाय्यक गणेश सोडगीर,पुरवठा लिपीक अक्षय बसगुंडे,महसूल सेवक प्रकाश कांबळे,वाहन चालक भालेराव कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली.दीर्घ कालावधीनंतर झालेल्या या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.तहसील प्रशासनाने यापुढेही अशी तपासणी मोहीम सुरू ठेवावी अशी मागणी सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.







