Home चंद्रपूर सातलवाडा येथील विद्यार्थ्याचा नवोदय विदयालय निवड प्रक्रीयेत सुयश

सातलवाडा येथील विद्यार्थ्याचा नवोदय विदयालय निवड प्रक्रीयेत सुयश

125

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.19मार्च):-साकोली तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सातलवाडा येथील विद्यार्थी नवोदय विद्यालय निवड प्रकियेत मोठे यश संपादन केले आहे.

यात (१) कुमारी मैथिली सतिश बिसेन या विधार्थांनीला १००% पैकी ९६.२५ % टक्के गुण प्राप्त केले.(२) कुमार लावण्य ओंमकार पटले याला ९५% टक्के गुण प्राप्त झाले.(३) कुमार अर्णव अनिल गजभिये या विद्यार्थाने ९२.५०% टक्के गुण प्राप्त केले. या सर्व विद्यार्थ्यांचे पालक वं मार्गदर्शक शिक्षक सचिन वंजारी सर व सचिन गणविर सर यांचे ही विषेश कौतुक. विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटी मुळे यांनी निवड प्रक्रियेत यश शक्य झाले आहे.

भविष्यातही असेच उत्तुंग भरारी घेत राहतील हिच सदिच्छा! मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग तसेच गावकरी या सर्व विदार्थांचे कौतुक होत आहे. आयुष्याच्या पुढील वाटचाली करीता उमेश जी. बोरकर भा. लो. क. सांस्कुतीक संघटना साकोली तालुका अध्यक्ष यांनी सर्व विधार्थांना मनःपूर्वक सुभेच्छा ! दिल्या आहेत.