Home महाराष्ट्र नर्सेसची ५०० कोटींची आर्थिक लूट थांबवा ‘बामसेफ’ प्रणित RMBKS चा आरोप;महाराष्ट्रातील हजारो...

नर्सेसची ५०० कोटींची आर्थिक लूट थांबवा ‘बामसेफ’ प्रणित RMBKS चा आरोप;महाराष्ट्रातील हजारो परिचारिका 7 एप्रिल रोजी मुंबईत धडकणार

804

▪️प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात परिचारिकांचा संताप,राज्य सरकारचे दुर्लक्ष

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.2मार्च):-महाराष्ट्र परिचर्या परिषदेने (MNC) लादलेल्या जाचक CNE/CPD अटींच्या नावाखाली राज्यातील ३ लाखांहून अधिक परिचारिकांची सुमारे ५०० कोटी रुपयांची आर्थिक लूट होत असल्याचा खळबळजनक आरोप ‘बामसेफ’ प्रणित राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) आरोग्य विभागाने केला आहे. या अन्यायाविरोधात आणि नर्सेसच्या स्वाभिमानासाठी जागतिक आरोग्य दिनी, म्हणजेच ७ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर विराट जनआंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

नेमका आरोप काय?:- महाराष्ट्र परिचर्या परिषदेने ३ ऑक्टोबर २०२४ च्या परिपत्रकानुसार, नर्सेसना त्यांचे रजिस्ट्रेशन रिनिवल (नूतनीकरण) करण्यासाठी १५० क्रेडिट पॉईंट्स (CNE/CPD) पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. या अटीमुळे राज्यातील परिचारिकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

RMBKS चे मुख्य आरोप आणि मागण्या: नियम मोफत, वसुली करोडोंची: इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या (INC) मार्गदर्शक सूचनांनुसार CNE प्रशिक्षण मोफत असणे आवश्यक आहे. मात्र, महाराष्ट्रात एका नर्सला हे 150 पॉईंट्स मिळवण्यासाठी 15 हजार ते 20 हजार रुपये मोजावे लागत आहेत. हि सरळ सरळ परिचारिकांची आर्थिक, मानसिक, शारीरिक खूप मोठी पिवळवणूक, छळ असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

*ग्रामीण आरोग्य सेवेवर परिणाम*: ग्रामीण भागातील नर्सेसना हे प्रशिक्षण घेण्यासाठी जिल्हा ठिकाणी जावे लागते. यामुळे त्यांना सुट्ट्या घ्याव्या लागतात, परिणामी ग्रामीण रुग्णसेवा विस्कळीत होत आहे.

*ऑनलाइन प्रणालीची मागणी*: राज्य शासनाने AI च्या धर्तीवर तात्काळ स्वतंत्र ऑनलाइन ॲप विकसित करून घरबसल्या मोफत CNE करण्याची सोय करावी, जेणेकरून नर्सेसचा वेळ आणि पैसा वाचेल.

*रजिस्ट्रेशनशी संबंध नको:* CNE/CPD चा संबंध नर्सेसच्या रजिस्ट्रेशन रिनिवल शी जोडू नये आणि ही सक्तीची अट रद्द करावी.

*”सरकारचे आश्वासन हवेतच!”:*

या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते तत्पूर्वी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदने देण्यात आली होती, मंत्रालयाने चौकशीचे परिपत्रक काढले असले, तरी प्रत्यक्ष जमिनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही. नर्सेसवरील आर्थिक भार तसाच कायम असल्याने आता आरपारची लढाई लढण्याचा निर्णय RMBKS ने घेतला आहे.

“राज्यातील ३ लाख नर्सेसकडून प्रत्येकी १५-२० हजार रुपये उकळले जात आहेत. हा आकडा 400/ 500 कोटींच्या घरात जातो. हा पैसा कोणाच्या खिशात जात आहे? नर्सेसच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांविरुद्ध आम्ही आता मुंबईत तीव्र जनआंदोलन करणार आहोत.”

— अमोल कुमार कवाने, राज्य सचिव, RMBKS (आरोग्य विभाग) 

*परिचारिकांना सुवर्ण संधी* 

निरंतर परिचर्या प्रशिक्षण कार्यशाळा ( CNE/ CPD ) च्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रात परिचारिकांची होत असलेली आर्थिक, मानसिक, शारीरिक पिळवणूक थांबवायची असेल त्यांनी 7 एप्रिल रोजी सकाळी ठीक 10 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे येण्याची अत्यंत आवश्यकता आहे त्यासाठी त्यांनी बामसेफ प्रणित RMBKS या संघटनेच्या सर्व सूचनांचे पालन करावे व खालील फोन नंबर वर संपर्क साधावा 8087357181

कैलास गांधरे, 8857834152

अविनाश शेंडे, 9175756038

प्रेम बोबडे, 7507844387

अमोल कुमार कवाने,

9403223307 मेघा मेश्राम

*चला मुंबई,आझाद मैदानाकडे!*

RMBKS संघटनेने महाराष्ट्रातील सर्व शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील नर्सेसना आवाहन केले आहे की, या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी 7 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे अशी माहिती अनिल जायभाये बीडकर यांनी दिली आहे.