Home महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख अलाउद्दीन यांनी दिला अमरण उपोषणाचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख अलाउद्दीन यांनी दिला अमरण उपोषणाचा इशारा

234

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

 गंगाखेड(दि.5मार्च):-येथील आठवडी बाजार,रोज बाजार तसेच नगरपरिषद हद्दीतील विविध लिलावांमधून प्राप्त झालेल्या रकमेबाबत पारदर्शकता ठेवावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख अलाउदीन शमशोदिन यांनी (दिनांक ४ मार्च बुधवार) रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.संबंधित सर्व लिलावांची रक्कम नगरपालिकेच्या खात्यात जमा झाली आहे का,याबाबत सविस्तर माहिती ८ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात द्यावी,अन्यथा अमरण उपोषण करण्याचा इशाराही शेख अलाउद्दीन यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात पुढील बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे गंगाखेड नगरपालिकेची रोज बाजार पावती आठवडी बाजार पावती नगरपालिकेच्या हद्दीतील मोकळ्या जागांचा लिलाव बॅनर व स्ट्रीट लाईटवरील बॅनर लिलाव शनिवार बाजार पार्किंग लिलाव या सर्व लिलावांमधून प्राप्त झालेली व उर्वरित रक्कम नगरपालिकेच्या अधिकृत खात्यात जमा करण्यात आली आहे का,याची स्पष्ट माहिती द्यावी.जर संबंधित रक्कम जमा केलेली असेल, तर त्या खात्याच्या स्टेटमेंटची प्रमाणित प्रत आम्हाला उपलब्ध करून द्यावी.

जर रक्कम अद्याप जमा केलेली नसेल,तर आजपर्यंत ती का जमा करण्यात आलेली नाही, याचे सविस्तर स्पष्टीकरण ८ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात द्यावे,अशी मागणी करण्यात आली आहे.नगरपरिषदेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता व जबाबदारी आवश्यक असल्याचे सांगत,ठराविक कालावधीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे नगरपरिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल,असा इशाराही शेख अलाउदिन यांनी दिला आहे निवेदणार त्यांची स्वाक्षरी आहे.