

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.7मार्च):-छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वर्षांपूर्वीच भविष्यातील आव्हानांचा अंदाज घेऊन त्यासाठी तयारी केली होती.नौदलाची स्थापना,किल्ल्यांची सुरक्षा, संरक्षण व्यवस्था,प्रशासकीय व्यवस्था, लष्करी शिस्त,आर्थिक विकास इत्यादी बाबी आधुनिक काळातही थक्क करणाऱ्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि अद्वितीय नेतृत्व क्षमता आजही भारतीयांना/युवकांना प्रेरणादायी आहे असे मत प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे यांनी व्यक्त केले आहे.
अमरावती जिल्ह्यातील शेंदुरजना माहुरे येथील मानवता मंदिर परिसरात आयोजित शिवजयंती महोत्सव कार्यक्रम प्रसंगी उपस्थितीताना मार्गदर्शन करताना केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत मुख्याध्यापक गुणवंतराव देवतारे तर प्रमुख पाहुणे म्हणून तिवसा पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव माहुरे, बालकीर्तनकार अभिजित बेलूरकर,खरेदी विक्री संघ तिवसाचे सभापती सुरेशराव मेटकर, श्री संत शंकर महाराज कला वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे,प्रा. डॉ. शीतल माहुरे,नागपूर मनपाच्या स्थापत्य अभियंता कु. हर्षदा श्याम मंजूरकर,शिवसेना तालुका प्रमुख दिलीपराव केणेकर, शहर प्रमुख देविदासजी निकाळजे,गुरुदेव सेवा मंडळ पिंपळखुटाचे प्रा.प्रशांत टांगले,खरेदी विक्री संघ तिवसाचे संचालक आकाश उर्फ बंटी माहुरे,सरपंच आशिष माहुरे, उपसरपंच गौरी आमले, माजी उपसरपंच प्रदीप माहुरे आदी मान्यवर उपस्थितीत होते.शिवजयंती पर्वावर विविध क्षेत्रातील कर्तृतवान व गुणवत्ता प्राप्त मान्यवराचा सत्कार करण्यात आला. त्यात बालकीर्तनकार अभिजित बेलूरकर, प्रा. डॉ. नरेश इंगळे, प्रा. डॉ.शीतल माहुरे, कु. हर्षदा शाम मजूरकर आदीचा समावेश आहे.
विलासराव माहुरे यांचे पुढाकारातून गत 46 वर्षापासून हा शिवजयंती महोत्सव आयोजित केला जातो.हा महोत्सव अविरत कायम राहिला पाहिजे त्यासाठी नवयुवकानी पुढे येण्याची अपेक्षा तिवसा पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव माहुरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून अपेक्षा व्यक्त केली आहे.याप्रसंगी उपस्थिती मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृतवार प्रकाश टाकला.
सूत्रसंचालन धनराज मनवरे तर आभार प्रदर्शन कु.राधिका माहुरे हिने केले. कार्यक्रम यशस्वीते करिता शिवजयंती महोत्सव समिती पदाधिकारी व गावकरी यांनी परिश्रम घेतले.







