Home महाराष्ट्र प्रशांत माळवदे यांना आदर्श संपादक पुरस्काराने सन्मानित

प्रशांत माळवदे यांना आदर्श संपादक पुरस्काराने सन्मानित

153

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.8मार्च):-पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांना आम्ही मुंबईकर वृत्तपत्रच्या वतीने पुणे कात्रज येथे उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संस्कृतीका आणि साहित्य रत्न पुरस्कार 2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काकडे देशमुख, जेष्ठ कवी भारत कवितके,प्रिया दामले,अभिनेते नीलेश दातार,योगिता कोठेकर, संपादक प्रमोद सूर्यवंशी,उपसंपादिका वसुधा नाईक आदि मान्यवराच्या हस्ते

 तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांना शाल, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी संपादक प्रमोद सूर्यवंशी म्हणाले की पूर्वी ही माळवदे यांना सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत.अचूक व तात्काळ बातम्या प्रसिद्ध करण्यात येत असल्या बद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. असे ही प्रमोद सूर्यवंशी म्हणाले.