Home महाराष्ट्र दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) तर्फे संजय पारडे यांची...

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) तर्फे संजय पारडे यांची बौद्धाचार्य पदी नियुक्ती

137

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.10मार्च):-फुले- शाहु – आंबेडकरी चळवळीतील बहु आयामी समाजाभिमुख, सृजनशील, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले घाटकोपर मधील आयु. संजय ज्ञानोबा पारडे यांची बौद्धाचार्य म्हणुन नियुक्ती करण्यात आली.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या केंद्रीय प्रशिक्षण विभागाद्वारे आयोजित केलेल्या बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचा कालावधी यशस्वीरित्या पुर्ण करून मुंबई प्रदेश महाराष्ट्र अंतर्गत लेखी, तोंडी परीक्षेत उच्चतम गुणांक मिळवुन उत्तीर्ण झाल्याबद्दल संजय ज्ञानोबा पारडे यांना सन्मानपूर्वक बौद्धाचार्य प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यकर्ता, कवि- साहित्यिक, पत्रकार म्हणून नावलौकिक पावलेले संजय पारडे हे जिल्हा धाराशिव मराठवाड्याचे सुपुत्र असून त्यांनी विद्यार्थी दशेत असतानाच मुंबई पँथरमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. आंबेडकरी चळवळीचे बाळकडू हे त्यांचे आजोबा कालकथित-तुकाराम एकनाथ पारडे यांकडूनच मिळाले. त्यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या भूमिहीन आंदोलनात सहभाग घेऊन राजकैदी म्हणुन सोलापूरच्या तुरुंगात काही काळ तुरुंगवास भोगला होता.

वडील आयु. ज्ञानोबा तुकाराम पारडे हे मुंबई महानगर पालिकेच्या सेवेत कार्यरत असताना मजदुर युनियनला सुरुंग लावत घरादाराची पर्वा न करता श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दि बॉम्बे मुन्सिपल युनियन मध्ये लिडर म्हणुन काही काळ कार्य केले. आई कौसल्याच्या संस्कारातूनच संजय सारख्या नवतरुणाने फुले शाहु आंबेडकरी चळवळीत स्वतःला झोकुन दिले. विभाग पातळीवर नगरसेवक स्मृतीशेष – पां.रा.कदम यांच्यासमवेत समाजसेवेचे व्रत हाती घेऊन समाजाचे प्रश्न सोडविण्याकामी कार्य करीत असताना त्यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवून चळवळीशी नाळ तुटू दिली नाही. पत्रकारितेच्या माध्यमातून चौफेर असताना प्रस्थापित वृत्तपत्रांना छेद देत वृत्तरत्न सम्राट, विश्व सम्राट, लोकनायक, महानायक आदींमध्ये तुटपुंज्या मानधनावर पत्रकार म्हणुन कार्य केले. याअगोदर त्यांनी चळवळींची पत्रे स्मृतीशेष- गंगाधर पानतावणे संपादित अस्मितादर्श, रा.सो.नलावडे संपादित आम्रपाली, चंद्रहास गमरे संपादित सनद, जगन्नाथ मोरे संपादित निर्भीड, विलास जाधव संपादित लढत, गौतम जाधव संपादित प्रज्ञावंत,अशा अनेकांशी आपला अमूल्य वेळ देत निगडीत राहुन राबराब राबले मात्र या क्षेत्रात सर्वांकडून त्यांची उपेक्षाच झाली. अखेर कौटुंबिक जबाबदारीच्या ओझ्याखली असताना मात्र घरातील वडीलधारा असल्याने त्यांनी आपल्या कार्यासोबत अर्थार्जनासाठी साप्ताहिक वृत्तपत्र डॅशिंग महाराष्ट्र सुरू करून एक दमदार कामगिरी केली. याकामी त्यांचे लहान बंधु आयु. विजय पारडे यांनी आणि सहचारिणी सुनिता संजय पारडे, गायकवाड मोलाची साथ दिली ती आजही कायम आहे. याकामी त्यांच्या तिन्हीही भगिनी रमाताई, सुजाताई, दीक्षाताई यांनी वेळोवेळी मनोधैर्य वाढवले. त्यांच्या मंगल कामना सदोदित त्यांच्या पाठीशी आहेत हे सांगताना आयु.संजय पारडे यांचे डोळे भरून आले. 

                                           आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते मार्मिकपणे म्हणाले आजच्या घडीला माझे हे सुखी- समृद्ध, संस्कारित, आनंदी कुटुंब परिवर्तनाच्या वाटेवर असताना धम्मपथावर आरूढ आहे. यापेक्षा दुसरा आनंद कोणता बरे असु शकेल!

  आज समाजाच्या सर्वच स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. ते पुढे म्हणाले की, माझ्यावर नितांत आदर विश्वास ठेऊन मला सहकार्याची, सदभावनेची, मंगलमैत्री जोपासून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष- आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब,राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय प्रमुख – एस. के. भंडारे साहेब,मुंबई प्रदेशचे आदरणीय विलास वानखेडे साहेब, आदरणीयॲड. एस.एस.वानखेडे साहेब, मुंबई सरचिटणीस – दयानंद बडेकर साहेब,प्रशिक्षण काळात आम्हास आशीर्वाद देणारे भंते विशुद्ध बोधिजी, भंते संघपाल जी, सुनिल बनसोडे गुरुजी, सिद्धार्थ अहिरे गुरुजी, प्रवचन मालिकेला लाभलेले वसंत पराडसर, मुंबई संघाला दिप्तीताई लोखंडे, सुषमाताई कसबे, स्वाती गायकवाड, सुषमाताई पवार, प्रशांत गडकरी, विजय कांबळे, चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदिप कांबळे, अशोक केदारे, रागिणीताई पवार,अनिल मनोहर, मोहन सावंत,बी.एम.कांबळे, विजय कांबळे, सी. बी. तेलतुंबडे, बापूसाहेब निकाळजे, अनिल पहुरकर, चंदाताई कासले,विलास ढोबळे, मटकर, मुख्य परीक्षक – सुनंदाताई पवार या सर्व मान्यवरांचा ऋणाईत. तर झोन क्रमांक ६ चे अध्यक्ष – रामु खंडागळे, झोन क्रमांक ६ महिला आघाडीच्या प्राची शिंदे, असल्फा शाखा अध्यक्ष – रोहिदास कांबळे मास्तर, उपाध्यक्ष – भीमराव वाघमारे, सचिव – हरीभाऊ अहिरे, कोषाध्यक्ष – डी. आर.बागुल, संघटक – वामन गोखले, दशरथ अडसूळ, एम.डी.वाघमारे, सत्यवर्मा गांधले तसेच तमाम बौद्धाचार्यांना मंगल मैत्री व्यक्त केली.