

▪️फुले दाम्पत्याने समस्त भारतीयांना शिक्षणाच्या माध्यमातून गुलामगिरीतून मुक्त केले : जे एस पवार( मुख्याध्यापक)
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगाव(दि.11मार्च):-शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतातील थोर समाजसेविका ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही टी माळी यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
एच डी माळी यांनी सावित्रीमाईचा जीवनपट उलगडून त्यांचे सामाजिक – शैक्षणिक कार्य विशद केले. ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतिराव फुले ही स्टार प्रवाह वरील मालिका संध्या ७ः३० टीव्हीवर सुरू आहे. सर्वांनी ही मालिका जरूर पहावी व खरा इतिहास समजून घ्यावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार पी डी पाटील यांनी मानले.







