Home महाराष्ट्र गंगाखेडच्या सर्वच हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा सर्रास वापर?

गंगाखेडच्या सर्वच हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा सर्रास वापर?

180

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.13मार्च):-शहरातील बऱ्याच हॉटेल,ढाबे व खाद्य व्यवसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त होत असून,यामुळे सामान्य ग्राहकांना गॅस सिलेंडरच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत असल्याची बाब पुढे आली आहे.या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व हॉटेलांची तपासणी करून त्यांना व्यावसायिक १९ किलोचा गॅस सिलेंडर वापरणे बंधनकारक करावे,अशी मागणी गंगाखेड येथील अक्षय गॅस एजन्सीकडून तहसील प्रशासनाकडे करण्यात आली आहे.याबाबत एजन्सीच्या वतीने (दिनांक ७ मार्च) रोजी गंगाखेड तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.

अमेरिका इराण युद्धामुळे घरगुती गॅसचा तुटवडा भासत असल्याने आता महिन्यातून एकच गॅस सिलिंडर बुक करता येणार आहे ज्याच्या नावावर नोंदणी असेल त्यांनी आपली केवायसी करून घ्यावी,जो नंबर दिला आहे त्याच नंबर वरून बुकिंग करावी असे आवाहन अक्षय गॅस एजन्सीच्या वतीने करण्यात आले आहे.घरगुती गॅस धारकांना गॅसचा तुटवडा भासू नये यासाठी तहसील प्रशासनाने शहरातील हॉटेल व खाद्यव्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याची तपासणी करावी त्यामुळे घरगुती ग्राहकांना गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवर परिणाम होणार नाही.

प्रशासनाने शहरातील सर्व हॉटेलांची नियमित तपासणी करून त्यांना व्यावसायिक गॅस सिलेंडर १९ किलो वापरणे सक्तीचे करावे,अशी मागणी करण्यात आली आहे.महिन्यातून किमान एकदा तपासणी मोहीम राबविण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.निवेदनाची प्रत गंगाखेड पोलीस ठाण्यालाही सादर केली असून,संबंधित विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.