Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात आंतर विभागीय शक्तीतोलन स्पर्धेचे यशस्वी आयोजन

चोपडा महाविद्यालयात आंतर विभागीय शक्तीतोलन स्पर्धेचे यशस्वी आयोजन

89

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.21मार्च):-महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर विभागीय शक्तीतोलन पुरुष व महिला स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.

     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे उपस्थित होते. तसेच क. ब. चौ. उ. म. विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांच्या हस्ते शक्तीचे प्रतीक श्री हनुमाच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.   

    या उदघाटन प्रसंगी डॉ. दिनेश पाटील यांनी खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होतांना वर्षभर मेहनत करून आपण पदक प्राप्त करण्याच्या उद्देशाने सराव केला तर त्याचे फळ अवश्य मिळते म्हणून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन पदक प्राप्त करण्याची आशा व्यक्त करून बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.

    त्याचप्रमाणे याप्रसंगी निवड समिती सदस्य प्रा. डॉ. गोविंद मारतळे, क्रीडा संचालक, फैजपूर यांनीही क्रीडा क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.पदक प्राप्त केल्यामुळे आपल्याला नोकरी मिळू शकते याविषयी नोकरीं मिळालेल्या खेळाडूंचे उदाहरणे देऊन बहुमूल्य मार्गदर्शन करून खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

        या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच सचिव, डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली असता खेळाडूंची मेहनत आणि कामगिरी बघून त्यांचे कौतुक केले.

     याप्रसंगी निवड समिती सदस्य डॉ. दिनेश तांदळे, भडगाव, डॉ. मुकेश पवार, भालोद, उपप्राचार्य प्रा.डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ तसेच विद्यापीठाच्या विविध विभागातून आलेले क्रीडा संचालक, अमळनेर येथील डॉ. शैलेश पाटील, चोपडा येथील डॉ. विजय पाटील, नवल नगर येथील प्रा. विजय शिंदे इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी धुळे, जळगाव, नंदुरबार आणि एरंडोल या विभागातून खेळाडू आले होते.

या स्पर्धामधून निवड झालेले खेळाडू चेन्नई येथे संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धामध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धांचे आयोजन व नियोजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक डॉ. क्रांती सं. क्षीरसागर यांनी केले  तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिमखाना विभागातील  अमोल पाटील,  सुधाकर बाविस्कर आणि आर. एच. पाटील यांचे सहकार्य लाभले.