Home महाराष्ट्र धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

144

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.23मार्च):-भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा गंगाखेड,समता सैनिक दल आणि संघमित्रा महिला मंडळ,कौडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबुद्ध नगर,कौडगाव येथे दहा दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ (दिनाक २० मार्च शनिवार) रोजी करण्यात आला. सदरील शिबिर दिनांक २९ मार्च पर्यंत चालणार आहे.

या शिबिरासाठी केंद्रीय धम्म प्रशिक्षिका म्हणून सुनिताताई मस्के उपस्थित असून त्या सहभागी उपासक-उपासिकांना गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म,अष्टांगिक मार्ग,दहा परमिता तसेच बौद्ध धम्माचे नीतिनियम याबाबत दररोज सायंकाळी ७ ते ९ पर्यंत सखोल मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून शिबिराची विधिवत सुरुवात झाली.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तालुकाध्यक्ष पंडितराव पारवे उपस्थित होते, कार्यक्रमाचे उद्घाटन गौतम दिपके (सरचिटणीस,भा.बौ.महासभा,परभणी दक्षिण) यांच्या हस्ते पार पडले. 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.इंजी.एम.एम.भरणे (जिल्हाध्यक्ष,परभणी उत्तर),दशरथ गायकवाड,मुंजाजी कांबळे (बार्टी प्रकल्पाधिकारी),ॲड.सिद्धार्थ खरे,अविनाश सरवदे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा गंगाखेड तालुका शाखेचे कोषाध्यक्ष गोरखनाथ कांबळे,संरक्षण उपाध्यक्ष लहूराज केदारे,प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष बालासाहेब पारवे,सचिव नाना लांडगे,हिशोब तपासणी प्रमुख भिमशाहिर श्रावण गायकवाड तसेच भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सर्व धम्म उपासक-उपासिकांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य रमेश जोंधळे यांनी केले.समारोपाच्या वेळी भिमशाहिर श्रावण गायकवाड यांनी भीम गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.सरनाताई घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.