एका संशयिताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

75

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.21एप्रिल):- गंगाखेड तालुक्यातील मुळी येथील रहिवासी असलेली पंधरा वर्षीय सात महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे शनिवार रोजी अपहरण झाले असुन मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून रविवार 20 एप्रिल रोजी सायंकाळी एका संशयिताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील मुळी येथील पंदरा वर्ष सात महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी शनिवार 19 एप्रिल रोजी परीक्षेला जाते म्हणुन मुळी येथुन गंगाखेड येथे आली.परंतु सायंकाळ पर्यंत शाळेत गेलेली मुलगी परत न आल्याने शनिवार रोजी आई, वडील व तिचे नातेवाईकांनी तिचा मुळी गावासह गंगाखेड शहरात तसेच नातेवाइकांकडे शोध घेतला मात्र ती मिळुन आली नसल्याने अपहत मुलीच्या वडिलांनी रविवार 20 एप्रिल रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात येऊन परीक्षेसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीस गावातील संशयीत व्यक्ती किशोर सुनिल एंगडे याने अज्ञात कारणासाठी 

फुसलावुन पळवुन नेले असल्याची फिर्याद दिल्याने किशोर सुनिल एंगडे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि सिद्धार्थ इंगळे करीत आहेत.