सुंदर शाळा स्पर्धेत संस्कृती विद्यालय द्वितीय 

48

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.4एप्रिल):- शंकरपूर येथून जवळच असलेल्या डोमा येथील संस्कृती बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचलित संस्कृती माध्यमिक विद्यालय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत चिमूर तालुक्यातील द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

 डोमा हे गाव तीन हजार लोकवस्ती असून निसर्गाच्या कुशीत बसलेला आहे, या गावात जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉक्टर सतीश वारजुकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी या दृष्टिकोनातून माध्यमिक शाळेची स्थापना करण्यात आली. 

                                                   या शाळेच्या मुख्याध्यापक पदी प्रदीप गारघाटे हे विराजमान आहेत. ते या शाळेचे नाव लौकिक प्राप्त करण्यासाठी या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. या शाळेचा निकाल सुद्धा शंभर टक्के लागत आहे. या शाळेमध्ये सुसज्ज इमारत असून स्वतंत्र वर्ग खोल्या क्रीडांगण प्रयोगशाळा वाचनालय स्वच्छ प्रसाधनगृह स्वतंत्र अध्यापक कक्ष आहे, सोबतच या शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करून शाळेच्या सौंदर्यात भर पडलेली आहे. या शाळेला दरवर्षी विज्ञान प्रदर्शनी सातत्याने यश मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत त्यांनी या वर्षी भाग घेतला असून पहिल्याच वर्षी त्यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले असून दोन लाख रुपयांचा निधी शासनातर्फे या शाळेला मिळालेला आहे.

                                                    या यशात संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर व त्यांचे मोठे बंधू माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत आहे. या मार्गदर्शनातून त्यांनी ही यश प्राप्त केले आहे या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी कांबळे, विस्तार अधिकारी बोधाने, खांडेकर, महाले सर केंद्रप्रमुख, गायकवाड विषय तज्ञ, पंधरे सोनवाने बगडे आत्राम पोणिकर गोंडाने आदींनी अभिनंदन केलेले आहे.