दिनांक 11 ते 15 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमीत्ताने चिमूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

95

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.5एप्रिल):-अखिल भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दिनांक 11 ते 15 एप्रिल रोजी चिमुर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे संयुक्त जयंती निमीत्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असुन दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर सायंकाळी 6 वाजता स्टार मुझीकल इव्हेंट ‘आवाज क्रांतिचा’ संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. 

दिनांक 12 एप्रिल रोजी सांस्कृतीक कार्यक्रम व दिनांक 13 एप्रिल रोजी रांगोळी स्पर्धा व सामान्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.

दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता पंचशिल चौक, नेहरू वार्ड, इंदिरा नगर येथे ध्वजारोहन झाल्यानंतर सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानावर होणाऱ्या मुख्य समारंभाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते संतोष भैसारे राहणार आहेत. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बालविकास प्रकल्प अधिकारी पुनम गेडाम, ठानेदार संतोष बाकल, प्रा. डॉ. चंद्रभान खंगार यांना निमंत्रीत करण्यात आलेले आहे. सायंकाळी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणुक चिमुर शहरातील मुख्य मार्गावरून निघेल. दिनांक 15 एप्रिल रोजी सामुहिक भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रात सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय बौद्ध महासभा, त्रिशरन महिला मंडळ, समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.