महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा घुग्घूसच्या अध्यक्षपदी सुरेश खडसे तर कार्याध्यक्ष म्हणून संजय पडवेकर

143

✒️घुग्घूस(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई रजि. नं. 9819/सां शाखा घुग्घूस ची नूतन कार्यकारणी प्रा. महेश पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष बोरघरे यांच्या नेतृत्वात घुग्घूस येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा घुग्घूस च्या अध्यक्षपदी सुरेश पुरुषोत्तम खडसे, कार्याध्यक्ष संजय महादेव पडवेकर,उपाध्यक्षपदी इम्तियाज रज्जाक,सचिव पदी प्रणय कुमार बंडी, सहसचिव मोहम्मद हनीफ,सोशल मीडिया साहिल सैय्यद, संघटक पंकज रामटेके, कोषाध्यक्ष क्यामुल सिद्धिकी,तर सदस्य म्हणून संदीप चांभारे,दशरथ आसपवार व राहुल चौधरी यांची निवड करण्यात आली.नवीन कार्यकारणीला पत्रकाराच्या हितसंबधासाठी काम करण्याची मोठी जबाबदारी सोपविली आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश खडसे तर आभार प्रदर्शन साहिल सैय्यद यांनी केले.