✒️घुग्घुस(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
घुग्घुस(दि.7एप्रिल):-येथील आ.किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात दि.६ एप्रिल रविवार सकाळ १० रोजी आ.किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार भाजप नेता संजय तिवारी यांच्या नेतृत्वात घुग्घुस शहर माजी अध्यक्ष भाजपचे डाॅ.श्याम बोबडे यांच्या वतीने सर्वप्रथम मा. श्यामाप्रसाद मुर्खजी,डाॅ.दीनदयाळ व भारता माता यांच्या प्रतिमेस द्विपजवलीत करून सामुहिक एकत्रित पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आ.किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनानुसार माजी उपसरपंच संजय तिवारी म्हणटले की,भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रवादी राजकीय पक्ष आहे जो जागतिक मंचावर एक मजबूत, समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र म्हणून भारत स्थापन करण्यासाठी वचनबद्ध आहे. भारताला सक्षम राष्ट्र बनविण्याच्या उद्दीष्टाने, 6 एप्रिल 1980 रोजी नवी दिल्लीतील कोटला मैदान येथे झालेल्या कामगार अधिवेशनात भाजपची स्थापना झाली.पहिले अध्यक्ष श्री.अटल बिहारी वाजपेयी बनले.त्याच्या स्थापनेमुळे, भाजपाने आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय आणि लोकांच्या हिताच्या विषयांवर बोलणी केली तेव्हा भारतीय लोकशाहीमध्ये जोरदार सहभाग नोंदविला आणि भारतीय राजकारणाला नवीन परिमाण दिले.
तसेच सर्व नागरिकांना व कार्यकर्त्यांना राम जन्मोत्सव असल्याने सर्वांना राम नवमीच्या शुभकामना देण्यात आले.
याप्रसंगी भाजप नेते निरीक्षण तांड्रा, संतोष नुने,नीतु चौधरी,साजन गोहणे,संजय भोंगळे,राजकुमार गोडसेलवार,वैशाली ढवस, सुचीता लुटे,अनिल बाम,अमीना बेगम,श्याम आगदारी,हसन शेख,डाॅ.सुनील राम, सौ.उषा आगदारी,सुनीता गिव्हे,नीतु जयस्वाल,सुरज मोरपाका,मयुर कलवल,विशाल दामेर, सुनीता पाटील,मुक्ता धाबेकर, विजय माथणकर, चंद्रकांत पालावार,नंदकिशोर यादव, श्रीनु रामटेके, मुन्ना लोडे,अनुप भंडारी, राकेश भेदोंळकर,वनिता निहाल, स्मिता कांबळे, ज्योती बावरे,शारदा गोडशेलवार,शितल तोटा, विनोद भंडारकर, प्रकाश नागरे,प्रताप तांड्रा, बाडा टोंगे, तारकेश्वर यादव,राहुल झोडे,राजेंद्र लुटे,कामीनी देशकर, माया मांडवकर,राखी टोंगे, चंद्रमाला मन्ने, सुशीला डाखरे,संतोष पाटील, नरेंद्र कलसी,सामीया कटकम व पदाधिकारी उपस्थित होते.