घुग्घुस शहरात बरेच दिवसांपासून पाणीटंचाई

81

घुग्घुस शहरातील अनेक वार्डात पाणीटंचाई पाहता नागरिक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रमुख प्रभागात पाण्याची समस्या आहे. महिला, वृद्ध, लहान मुले पाण्यासाठी वणवण भटकत आहेत मात्र आजतागायत संबंधित विभागाने पाण्याचा प्रश्न सोडवला नाही का!

 शहरात पाणीटंचाई होण्याचे अनेक कारणं आहेत,जसे की वाढती लोकसंख्या, कमी पाऊस, आणि पाण्याचा गैरवापर. या समस्येवर उपाय म्हणून पाण्याचा योग्य वापर करणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, आणि पाण्याचे साठवण व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. 

तलाव, बंधारे आणि जलसाठवण तलावांची निर्मिती करणे आवश्यक आहे.पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.

 शहरात राजकारण शिगेला पोहोचले आहे. त्यांची नौटंकी शहरात चांगलीच गाजत असून, त्यामुळे आता नागरिक त्रस्त झाले आहेत. घुग्घुस येथील बरेच वार्डात प्रभागात गेल्या बरेच दिवसांपासून पाणीटंचाई आहे. घरांमध्ये पाणीटंचाई का, बोअरिंग, विहिरीकडे नागरिकांची धावपळ सुरू आहे. दिवसेंदिवस तपनओस पडत आहे, आणि मुख्य पाणी जीवनस्तर असल्यास पाणीटंचाई भागविण्यासाठी परिसरात टँकरद्वारे पुरेशा प्रमाणात नळ पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकात वारंवार करीत आहे.