विदर्भातील वाढत्या उन्हामुळे शालेय परीक्षा एप्रिलच्या शेवटी घ्याव्यात-संजय गजपुरे

94

✒️सतीश खोब्रागडे(नागभीड,तालुका प्रतिनिधी)मो:-9405533417       

 नागभीड(दि.10एप्रिल):-शिक्षण विभागाच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षा या विद्यार्थ्यांना गैरसोयी च्या असुन विदर्भातील वाढत्या उन्हामुळे याचा शासनाने फेरविचार करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांनी केली आहे. 

                      राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळेतील इयत्ता १ ते ९ चे वार्षिक परीक्षा, संकलित मूल्यमापन, पॅट परीक्षा यांचे आयोजन एकाच वेळी करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. राज्यातील सर्व शाळेत मार्च अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सदर परीक्षा घेतल्या जायच्या , मात्र परीक्षा झाल्यावर शाळा सुरू असले तरी विद्यार्थी उपस्थिती फार कमी राहत असल्याचे कारण देत परीक्षांचे आयोजन हे लवकर केल्याने विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी मिळत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्याने , शिक्षण मंत्रालयाने या सर्व परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्यात याव्यात व एप्रिल महिन्याच्या शेवटी पर्यंत त्या घेण्यात याव्या यासाठी फतवा जाहीर करीत वेळापत्रकच जाहीर करून त्या द्वारे परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

                         विदर्भात उन्हाचा तडाखा सुरु आहे. सध्या परिस्थिती मध्ये ४४ अंश पेक्षा ही जास्त तापमानाची नोंद झालेली आहे. शाळा सकाळ पाळीत असल्या तरी उन्हाची दाहकता आठ वाजेपासून शरीराला पोहचत आहे. दरवर्षी विदर्भातील तापमानाची नोंद घेता उर्वरित राज्यातील शाळा या १६ जून पासून नविन सत्रात सुरू होतात , मात्र विदर्भातील शाळा या २६ जून पासून सुरू होतात. असे असले तरी भर उन्हात विद्यार्थ्याला परीक्षा द्यायला लावणे हे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे झाले आहे. अपवादात्मक खाजगी व्यवस्थापन संचालित शाळा सोडल्या तर बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये फॅन व पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने याचा त्रास सहन करावा लागतो. 

                   सरकारने या विद्यार्थ्यांचा विचार करीत हा शासन निर्णय त्वरित रद्द करून येत्या १५ एप्रिल पर्यंत परीक्षा घेण्याचे नवीन सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी भाजपा नेते जिल्हा परिषद चंद्रपुर चे माजी सदस्य संजय गजपुरे यांनी केली आहे. अनेक खाजगी व जिल्हा परिषद शाळा मध्ये फॅन, कुलर ची सोय नाही, चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानाचा पारा दरदिवशी वाढतो आहे . त्याच प्रमाणे विदर्भातील इतर जिल्ह्यात सुद्धा तापमानात फार मोठी वाढ झाली आहे. अश्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना भर उन्हात परीक्षा द्यायला शाळेत येणे जीकरीचे ठरणार आहे. अनेक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी पायी,सायकल, बस ने येत असतात शाळेतून परत जाताना त्यांना उन्हाचा चटका सहन करावा लागतो. 

                     राज्यात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात उष्म घाताने अनेक व्यक्तींचा मृत्यू होतो. एकीकडे शासन उष्म घातापासून राज्यातील जनतेच्या बचाव व्हावा म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवित असते , याच बरोबर काळजी कशी घेता येईल याचे मार्गदर्शन करीत आहेत आणि दुसरीकडे मंत्रालयाच्या माळ्यावर वातानुकूलित खोलीत बसून विद्यार्थ्याच्या आरोग्याला धोका होईल असे निर्णय अधिकाऱ्यांकडुन घेतले जातात . 

                   ही बाब गंभीर असून लवकरात लवकर परीक्षा घेण्याबाबत विदर्भाच्या तप्त उन्हाळ्याची जाणीव असलेल्या संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता पुढाकार घेत शिक्षण मंत्रालयाच्या या निर्णयावर काहीतरी तोडगा काढण्याची विनंती संजय गजपुरे यांनी केली आहे. परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवडया पर्यंत असल्याने आणि परीक्षेचा निकाल हा १ मे ला जाहीर करायचा असल्याने शिक्षकांना सुद्धा निकाल तयार करायला वेळ कमी मिळणार आहे.