सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती प्रदान

553

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.12एप्रिल):- सावित्रीबाई फुले विद्यालयाची विद्यार्थीनी कु.तन्वी धनराज बनकर हिने आपल्या गुणवत्तेच्या बळावर राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती पटकावून विद्यालयाचा मान वाढविला. महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिली जाणारी ही शिष्यवृत्ती हिने अत्यंत हलाखीचा परिस्थितीला मात करून हे यश गाठले आहे.कु. तन्वी धनराज बनकर हिला 5000/- रु. चा धनादेश प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपिता म.जोतिबा फुले यांच्या जयंती प्रित्यर्थ ही शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम विद्यालयात उत्साहात पार पडला. प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक श्री. बी. एम नगराळे सर यांनी कु.तन्वी धनराज बनकर हिला धनादेश सुपूर्त केला. यावेळी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक -अध्यक्ष आदरणीय आयु. डॉ. पी. आर. मेश्राम साहेब, सचिव आयु. वि. पी. मेश्राम साहेब, कोषाध्यक्ष आयु. वाय. आर. मेश्राम साहेब, सदस्या सौ. लिना वि. मेश्राम मॅडम व इतर पदाधिकारी यांनी तन्वी चे अभिनंदन केले .तिच्या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या या यशाचे श्रेय तिने आई-वडील, गुरुजनवर्ग यांना दिले. या प्रसंगी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.