ने.हि. विद्यालय, ब्रम्हपुरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

64

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.15एप्रिल):-नेवाजाबाई हितकारिणी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरी येथे बोधिसत्व, महामानव, दीन-दुबळ्यांचे कैवारी, थोर अर्थशास्त्रज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती सोमवार, दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साह, अभिमान आणि आदरभावाने साजरी करण्यात आली.

या विशेष दिवशी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. कपूर नाईक सर होते. उपमुख्याध्यापक आदरणीय श्री. ए. डब्ल्यू. नाकाडे सर आणि पर्यवेक्षक आदरणीय श्री. पि. आर. जिभकाटे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री. नाईक सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी बाबासाहेबांचे शिक्षण, समाजासाठी केलेले योगदान, संविधान निर्मितीत त्यांची भूमिका, आणि सामाजिक समतेसाठी केलेले संघर्ष याचे प्रभावी वर्णन केले. “डॉ. आंबेडकर हे केवळ भारताचे संविधानकर्ते नव्हे, तर ते एका क्रांतिकारी परिवर्तनाचे शिल्पकार होते,” असे ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. बोरकर सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. त्यांनी कार्यक्रमाची शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी रूपरेषा आखली. कु. तुलेश्वरी बालपांडे मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे, शिक्षकवृंदांचे व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या जयंती कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या आचरणात उतरवण्याचा संकल्प घेण्यात आला.