नेफडो चे बाल संघटक देवेन रितेश टोंगे यांच्या वाढदिवसानिमित्त निंबाळा येथे क्रिकेट, व्हॉलिबाल किट वितरण

85

▪️सामजिक दायित्व जोपासत आपले कर्तव्यही जपावे.- नंदकिशोर वाढई , सरपंच 

✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

राजुरा(दि.15एप्रिल):-नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे गडचांदुर शहर बाल संघटक देवेन रितेश टोंगे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबाळा ता.राजुरा येथे गावातील मुलांना क्रिकेट व व्हॉलीबॉल किट वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्मार्ट ग्राम पंचायत कळमना चे उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढई उपस्थीत होते.

प्रमूख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश मेश्राम, सदस्य देवानंद मोहारे, विठ्ठल परचाके, ग्रामसेवक सिताराम मरापे, नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या रजनी शर्मा, मोहनदास मेश्राम, संतोष देरकर, श्रीरंग ढोबळे, नरेंद्र देशकर, कोरपणा तालुका महिला अध्यक्षा उषा टोंगे, सचिव अरुणा सालवटकर, संघटीका सुलभा कुरेकर, शितल धोटे, स्मिता विरुटकर, देवेन टोंगे, जी.प.शाळेचे मुख्याध्यापक गजानन गोवारदिपे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यारपन करण्यात आले.

नेफडो च्या वतीने सरपंच नंदकिशोर वाढई यांचा शॉल, श्रीफळ, वडाचे वृक्ष ,कुंडी भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबाळा शाळेला भारताचे संविधान पुस्तकं भेट देण्यात आले. देवेन च्या वाढदिवसानिमित्त गावातील मुलांना क्रिकेट व व्हॉलीबॉल किट वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले यांनी केले. आभार स्मिता विरुटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कविता शर्मा, बबलू चव्हाण, रवी बुटले, प्रणिता मांडवकर, सुवर्णा बेले आदींनी परिश्रम घेतले.  

अध्यक्षीय मनोगतातून नंदकिशोर वाढई यांनी सामाजिक दायित्व जोपासत आपले कर्तव्यही जपावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा, विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी असे सामाजिक उपक्रम आपण नेहमी घेतले पाहिजेत. नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले.