✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.16एप्रिल):-ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प हा एक आता आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प आहे.देशविदेशातील पर्यटक, प्रवासी लोक इथे भेटी देण्यासाठी येतात.इथे खेळाडू,राजकीय नेते,सामाजिक कार्य करणारे,चिञपटातील स्टार,कवी,लेखक,वन अभ्यासक व साहित्यिक, अनेक गणमान्य व्यक्ती भेट देण्यासाठी व जंगल सफारीसाठी येतात.
हा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अगदीच बालवयात असताना ह्या संपूर्ण अरण्यात भटकंती केली.प्राचीन काळी जयपूरचा राजा ह्या जंगलात शिकारीसाठी आला असता त्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी हिंसेपासून परावृत्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अगदी बालवयातच गोंदोडा,ताडोबा,रामदेगी येथील अरण्यात वनविहार केलेला आहे,त्यांनी वाघासारख्या हिंस्ञ प्राण्यांशी या अरण्यात मॆञी केली.ते वाघाच्या बछड्याबरोबर खेळत होते.गोंदोडा,ताडोबा,रामदेगी इ.स्थळावर व तेथील वनसृष्टीवर गावातील आदिवासी लोकांवर त्यांचे विशेष प्रेम होते.एका महान क्रांतीकारी संताचा सहवास या परिसराला लाभला आहे.
ताडोबा ह्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी आनलाईन बुकिंग करून जगभरातील लोक येतात तरी ह्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प ताडोबा असे नाव द्यावे अशी मागणी राज्यस्तरिय राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजेंद्र मोहितकर चिमूर यांनी केलेली आहे.