ग्रामगीता महाविद्यालयात डॉ. आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम

86

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

 चिमूर(दि.16एप्रिल):- ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त वतीने दिनांक 14 एप्रिल ते 16 एप्रिल, 2025, या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनात दिनांक 14 एप्रिल 2025 रोज सोमवार ला बाबासाहेबांना अभिवादन करून विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.

दिनांक 15 एप्रिल 2025 रोज मंगळवार ला विद्यार्थ्यांसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच दिनांक 16 एप्रिल 2025 रोज बुधवार ला ‘अंधविश्वास निर्मूलन’ या विषयावर पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत विजेते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. वरील विविध आयोजित कार्यक्रमात मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रा. डॉ.हुमेश्वर आनंदे, प्रा. संदीप मेश्राम, प्रा. निलेश ठवकर, प्रा. विवेक माणिक आणि डॉ. मृणाल वऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमांचे आयोजन रा.से.यो कार्यक्रम अधिकारी डॉ. बिजनकुमार शील आणि सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. सुमेध वावरे यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.