▪️ग्राम नवनिर्माणासाठी ग्रामगीतेनुरूप गावोगावी सेवाकार्य झाले पाहिजेत – चंदु पाटील मारकवार
✒️मुल(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मूल(दि.17एप्रिल):-आदर्श ग्रामनवनिर्माणासाठी ग्रामगीतेतील विचार आत्मसात करून तसे सेवा कार्य गावोगावी झाले पाहिजेत असे प्रतिपादन आदर्श राजगड चे शिल्पकार चंदु पाटील मारकवार यांनी मुल येथे केले.
वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामजयंती पर्वात अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळ मुल तालुका शाखा आणि श्री गुरुदेव बचत गट मुल च्या संयुक्त विद्यमाने रामलीला भवनात येथे श्रीगुरुदेव कार्यकर्ता प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . मुल च्या माजी नगराध्यक्षा प्रा. रत्नामाला भोयर, ग्राम. शंकर गुरनुले, प्रा.नामदेव मोरे , अविनाश जगताप, संदिप कटकुरवार, विजय चिताडे , विलास चौधरी , प्रभाकर भोयर आदींची उपस्थिती होती. आदर्श राजगड ची निर्मितीचा पाया हा राष्ट्रसंताची ग्रामगीता असून लोकसहभागातुन विकासाचे उत्तम उदाहरण असल्याचे बंडोपंत बोढेकर म्हणाले. प्रास्ताविक ग्राम. नामदेव पिज्दूरकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रातःकाळी सामुदायिक ध्यानपाठाने झाली यावेळी अशोक कोसरे यांनी चिंतन प्रस्तुत केले.भजन संमेलनात तालुक्यातील शाखा श्री गुरुदेव सेवा मंडळ मारोडा, उश्राळा चक, महिला मंडळ मुल, येरगाव, श्री संताजी महिला भजन मंडळ मुल, सिंतळा, पिपरी )दिक्षित) यांनी भजन सेवा दिली . यावेळी मुकेश गेडाम, रविंद्र चलाख यांनी कार्यानुभव कथन केल्यानंतर सहारे महाराज (मारोडा)यांचे ग्राम जयंती संबंधित कीर्तन झाले.
याप्रसंगी श्रीगुरुदेव सेवा मंडळातील जेष्ठ सेवाकर्ते उमाजी मंडलवार (चिखली), नामदेव गावतुरे (मुल), गजानन कोलप्याकवार (मारोडा),आशन्नाजी चौधरी (टेकाडी),शामरावजी कन्नाके (उश्राळा चक), गिरमाजी भोयर (मुल),डॉ. दांडेकर,खुशाल मसराम (डोंगरगाव), आनंदाबाई हळदीकर, प्रदिप नागापुरे येरगाव, सुधाकर टेकाम (पिपरी दिक्षित) यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच भजन संमेलनात सहभागी श्री गुरुदेव भजन मंडळाना स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रतिमा व प्रार्थना पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश उरकुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश मांडवकर तर अहवाल वाचन आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. वसंत ताजने यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुखदेव चौथाले,विजय लाडेकर,सितकुराजी देशमुख, चंद्रशेखर पिदुरकर, गुरूदेव बोदलकर,निलेश माथनकर, किसनराव वासाडे, माणिक पाटेवार, रमेश तांगडे, गजेंद्र वरगंटीवार, धनंजय गोहणे,नंदु बतकमवार, भगवान मंडलवार, अंबादास राजनकर,साईनाथ भुप्रतवार, संतोष चलाख, धनराज उईके,सुमनताई गोविंदवार,अल्का कामडी,प्रभा चौथाले, शशिकला मांडवकर, मंगला ताजने, सविता पिजदुरकर, सरीता झाडे, दिपाली मांडवकर, उषाताई वासाडे, कल्पना पिदुरकर, सुनंदा लाडेकर ,सुलोचना तांगडे, उर्मिला गोहणे, वैशाली सहारे,जयश्री माथनकर,प्रितीशा पाटेवार ,माधुरी बोदलकर आदींनी सहकार्य केले.