Home महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर

जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर

180

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

खटाव(दि.10ऑक्टोबर):- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत पध्दतीने कार्यवाही करण्याकरिता खाली दर्शविल्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे नाव, सभेचे ठिकाण व सभेची वेळ व तारीख याप्रमाणे विशेष सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. या सोडती १३/१०/२०२५ सकाळी 11:30 वाजता सर्व तालुक्यात एकाच वेळी सुरू होतील. प्रत्येक तालुक्याचे ठिकाण पुढील प्रमाणे असेल.

             सातारा जिल्हा परिषद- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा .खंडाळा पंचायत समिती-तहसिल कार्यालय. फलटण पंचायत समिती-सजाई गार्डन मंगल कार्यालय, जाधववाडी (फ).माण पंचायत समिती-तहसिल कार्यालय, दहिवडी सभागृह . खटाव पंचायत समिती -पंचायत समिती सभागृह, खटाव . कोरेगाव पंचायत समिती- तहसिल कार्यालय, कोरेगांव . वाई पंचायत समिती- देशभक्त किसनवीर सभागृह, पंचायत समिती, वाई .महाबळेश्वर पंचायत समिती -मधसंचालनालय, महाबळेश्वर .जावली पंचायत समिती- पंचायत समिती सभागृह, मेढा. सातारा पंचायत समिती- स्व. आ. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सभागृह, पंचायत समिती, सातारा .

,पाटण पंचायत समिती-लोकनेते बाळासाहेब देसाई, कृषी संकूल, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कराड-चिपळून रोड, . कराड पंचायत समिती-स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह (टाऊन हॉल), कराड

          जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सदर सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.