Home Breaking News टिप्पर आणि बसची जोरदार धडक

टिप्पर आणि बसची जोरदार धडक

93

✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)मो:-9168986378

नागभीड(दि.28मे):- तालुक्यातील बोन्ड येथे बाळापूर वरून येणारी एस. टी. महामंडळच्या बस क्र.एम. एच 07 सी 9373 ला विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परणे जोरदार धडक दिल्याने बासमधील प्रवासी बालबल बचावले. बिना क्रमांकाचे टिप्पर असल्याने वृत लिहीपर्यंत क्रमांक मिळू शकले नाही.

                                      घटनास्थळी पोलीस पोहचले असून कार्यवाही सुरु होती. अपघातात एक महिला व एक पुरुष जखमी झाले आहेत. लोकांचा जमावं होताच टिप्पर चालक फरार झाला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून ठाणेदार रमाकांत कोकाटे यांचे मार्गदर्शखाली ए. स. आय. मांढरे पुढील तपास करीत आहेत. 

मोठे वाहन येत असल्यानंतर दुसऱ्या दुचाकी वाल्यांना अडचण होते, परिणामी अपघाताशिवाय पर्याय नसतो. शेतकऱ्यांनी दोन्ही बाजूनी रस्त्याची जागा अतिक्रमण करून रस्त्यावर कुंपण करणे सुरु केले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे. जेणेकरून पुन्हा अपघात होणार नाही.