Home चंद्रपूर ॲड. यादवराव धोटे स्मृती महाविद्यालयातील दोन विद्यार्थीनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

ॲड. यादवराव धोटे स्मृती महाविद्यालयातील दोन विद्यार्थीनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

144

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.11ऑक्टोब):- ॲड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी, राजुरा संचालित ॲड. यादवराव धोटे स्मृती महाविद्यालय (फॅशन डिझायनिंग विभाग) येथील दोन विद्यार्थिनींनी शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा २०२४–२५ या सत्रामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग या अभ्यासक्रमात गुणवत्ता यादीत स्थान मिळवून महाविद्यालयात मानाचा तुरा रोवला आहे.

या परीक्षेत हर्षदा हरिचंद्र हेपट हिने 8.31/10 गुण घेत विद्यापीठातून द्वितीय क्रमांक, तर महेक रफीक शेख हिने 8/10 गुण घेत तृतीय क्रमांक मिळवून यशाचा पताका फडकावला आहे. या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. संजय धोटे, कोषाध्यक्ष सतीश धोटे, सचिव डॉ. अर्पित धोटे, प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार, प्रा. गोविंद झाडे, प्रा. योगिता साळवे, प्रा. गुणवंता कार्लेकर, प्रा. नाझिर सय्यद तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.