✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.21एप्रिल):-चिमूर तालुक्यातील 92 ग्रामपंचायतचे सन 2025 ते 2030 या कालावधीचे सरपंच पद निश्चितिचे कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे आदेश क्रमांक सा. शा./कार्या. 12/टे -4/1/का 4/ग्रापनी / 2025/279 दिनांक 4 एप्रिल 2025 नुसार चिमूर तालुक्यातील 92 ग्रामपंचायतचे सन 2025 ते 2030 या कालावधीचे सरपंच पद निश्चितिचे व जात व प्रवर्ग निहाय आरक्षण कार्यक्रम प्राप्त झाला आहे.
जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शक आदेशानुसार दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता तहसील कार्यालय परिसरातील राजीव गांधी सभागृहात आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. या महत्वपूर्ण कार्यक्रमात ग्रामीण भागातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार यांनी केले आहे.