राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे आमचे कर्तव्य :प्रा.सैय्यद सलमान

97

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर – जमाते इस्लामी हिन्द चंद्रपूर तर्फे ईद मिलनाच्या निमित्ताने सद्भावना राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात प्रमुख वक्ते म्हणून पुसद येथील युवा व्याख्याते तसेच संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून प्रा.सैय्यद सलमान उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणुन संत श्री.मनिष महाराज स्वामी नारायण मंदिर,चंद्रपूर .भंते अनिरुध्द बेरो, महाबोधी बुद्ध विहार दुर्गापूर, रेव्ह.अँथोनी अमेरसंत अंद्रिया चर्च चंद्रपूर,ग्यानी सरवन सिंग राठोड, गुरुद्वारा गुरुनानक दरबार, चंद्रपूर या प्रमुख धार्मिक प्रमुखांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरवात पवित्र कुरआन पाठणाने झाली. त्या नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जमाते इस्लामी हिंद चंद्रपूरचे शहर अध्यक्ष मिर्झा राहील यांनी केले. 

प्रमुख वक्ते प्रा. सलमान सरांनी आपल्या भाषणात ईद मिलन साजरा करण्याचा उद्देश हा सद्भावना निर्माण करण्याचा आहे तसेच आज आपल्या समाजात धार्मिक सलोखा निर्माण करने फार आवश्यक आहे. असे नमूद केले भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र मोठ्या गुण्यागोविंदाने वावरतात हे भारतीय परंपरेचे वैशिष्टय़े आहे.

अश्या प्रकारचे सद्भावनाप्रिय विचार प्रा.सैय्यद सलमान सरांनी व्यक्त केले. आलेल्या सर्वच मंडळीनी आशा प्रकारचे लोकांना जोडण्याचे कार्यक्रम नेहमी घेत राहावे आशा भावना प्रकट केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुफीयान खान यांनी केले तर आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे तसेच सर्व नागरिकांचे वाहिद खान यांनी आभार व्यक्त केले.