राममंदिर व परिसरातून सर्व देशी दारूची दुकाने व विदेशी दारूचे बार शहरा बाहेर हटविण्यात यावे- आमदार साहेब, या मागणीकडे लक्ष द्या हो!!!

166

✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)मो:-9168986378

नागभीड(दि.24एप्रिल):-“दारू चे गाव…. नागभिड”

अशी नवीन ओळख लवकरच निर्माण होणार. हल्ली नागभिड च्या काना कोपऱ्यात दारू विक्री सर्रास खुलेआम सुरू आहे. त्यामुळे मद्द प्रेमींना दारू मिळणे सहज व सोपे झाले असण्याने दारू सेवनाचे प्रमाणही वाढले. त्यामुळे दारू विक्री करणारे जाम खुशीत आहेत. मात्र गरीब व सामन्याचे संसार उद्ध्वस्त होत आहे हे सर्वत्र पहायला मिळते आहे. अनेक परिवारात कलह, वाद विवाद, नैरास्य, चिंता, अनगिनत गंभीर प्रश्न/समस्यांचे ग्रहण नित्याचे झाले आहे. 

*मोक्याचे ठिकाणी दारूचा बाजार…*

नागभिड नगर मधील मुख्य महत्वाचे, पवित्र ठिकाण म्हणजेच राममंदिर चौक व सभोवताल निरखून पहा, सर्वत्र “दारूचा बाजार” दिसतो. या चौकाच्या चारही दिशांना दृश्य व अदृश्य अशा दोन्ही पद्धतीने दारूचा व्यापार सुरू आहे. या ठिकाणी दररोज सकाळी व संध्याकाळी मुंबईतल्या समुद्र चौपाटी सारखी मद्द प्रेमोंची गर्दी खास करून पाहायला मिळते. गर्भ रात्री येथूनच दारूच्या पेट्या गाव खेड्यात तथा विविध ठिकाणी सर्रास पोहचविल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे. यावर पोलीस विभाग काय ते उपाय करतील. याकडे लक्ष केंद्रित झाले आहे.

एकीकडे राममंदिरचा परिसरात आता नवीन बस स्थानक लवकरच सुरू होणार आहे. येथून जवळच असलेले शैक्षणिक (कर्मवीर विद्यालय, जनता कन्या विद्यालय, गो.वा. कॉलेज) संस्थाने व तिथे जाणारे विद्यार्थी, राममंदिर, शिव मंदिर मध्ये जाणारे भाविक, मॉर्निग इवेनिंग वॉकला जाणारे, ग्रामीण रुग्णालय, प्रायव्हेट दवाखाने, लगतच्या प्रतिष्ठित निवासी कॉलनी, नगर, शासकीय कार्यालयात जाणारे कर्मचारी या ठिकाणाहूनच ये – जा करीत आहेत या सर्व कारणाने राममंदिर व सभोवतालच्या परिसराला एक वेगळे महत्व प्राप्त आहे त्यात आणखी भर पडणार आहे. मात्र येथील “दारूचा बाजार, व्यापार” यामुळे या परिसराचे पावित्र्य, महत्व घटत आहे. आता या परिसरातील सर्व दारूची दुकाने, दारूची प्रतिष्ठाने शहराबाहेर हटविणे अत्यावश्यक झाले आहे. 

नागभिड नगरवाशिय, महिला, समाजसेवी, राजकीय पुढारी, मीडिया यांनी ही मागणी रेटून धरणे व सर्व देशी दारूची दुकाने, विदेशी दारूचे बार/रेस्टॉरंट शहराबाहेर हटविणे यासाठी प्रयत्न करून समाज हिताचे कार्यात आपले योगदान दिले पाहिजे.

                                            नागभीडचे सुज्ञ नगर वासियांनी येथील “दारूचा बाजार, दारूचा व्यापार”यावर नियंत्रण आणणे ही गरज आजच ओळखली पाहिजे.

    दारूचा बाजार ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी आमदार बंटी भांगडिया काय उपाय योजना करतात याकडे जनता आशापूर्ण नजरेने पाहत आहेत.