

▪️चंद्रपूर जिल्ह्याचे निरीक्षक तथा विधान परिषदेचे मुख्य प्रतोद आमदार अभिजितदादा वंजारी यांनी केला दौरा
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.25एप्रिल):-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आणि चंद्रपूर जिल्ह्याचे निरीक्षक तसेच विधान परिषदेचे मुख्य प्रतोद आमदार मा. अभिजितदादा वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या. आज गुरुवारी (24 एप्रिल) चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली आणि मूल, बल्लारपूर या तालुक्यांमध्ये झालेल्या बैठकीत जिल्हा प्रभारी श्री. मुजीब पठाण यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत पक्ष संघटनेची सखोल चर्चा करण्यात आली आणि काँग्रेस पक्षाची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शनही करण्यात आले.
चिमूर येथे झालेल्या बैठकीत जिल्हा प्रभारी श्री. मुजीब पठाण, माजी आमदार श्री. अविनाश वारजुरकर, डॉ. सतीश वारजुरकर आणि श्री. धनराजभाऊ मुंगले यांची उपस्थिती होती.
नागभीड येथे झालेल्या बैठकीस प्रमोद चौधरी, माजी तालुकाध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, डॉ. सतीश वारजुरकर आणि गावंडे भाऊ उपस्थित होते.
ब्रह्मपुरीमध्ये तालुकाध्यक्ष खेमराज तिडके आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिंदेवाही येथे तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, प्रितीताई सालवे, स्वप्निल कावळे, बाबुराव गेडाम आणि सीमाताई सहारे सहभागी झाले.
सावली तालुक्यातील बैठकीस गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान, तालुकाध्यक्ष नितीन गोहने, मुन्नाभाऊ स्वामी, लताताई लाडगे व राजेश गड्डमवार यांची उपस्थिती होती.
मूल येथे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हा बँक अध्यक्ष संतोषसिंग रावत, तालुकाध्यक्ष गुरूदास गुरनुले, सुधीर शेळके व रूपालीताई सहभागी झाल्या.
बल्लारपूर येथील बैठकीत खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा प्रभारी मुजीब पठाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार श्री. सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष श्री. घनश्याम मुलचंदानी, ज्येष्ठ नेत्या डॉ. रजनी हजारे, श्रीमती विद्याताई यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत संघटनात्मक मजबुती, स्थानिक समस्या आणि आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत सखोल चर्चा झाली. आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्याचे आणि जनसंपर्क वाढवण्याचे आवाहन केले.



