✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.25एप्रिल):- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेऊन वरोरा येथील शासकीय विश्राम गृह येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री (म. रा.) मा. ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत ब्रम्हपुरीचे प्रसिद्ध उद्योजक दिपक उराडे, माजी नगराध्यक्ष रिता दीपक उराडे, किसान सेल काँग्रेसचे अध्यक्ष नानाजी तुप्पट, माजी नगरसेवक सुधीर राऊत, शिरीष साखरकर, राहुल ठेंगरी, डॉ. सौरभ लांजेवार, प्रज्वल निकुरे, गणेश धनजुळे, शंतनू लाखे, चेतन खेते सह अनेकांनी आज पक्षप्रवेश केला.
यावेळी हंसराजभैया अहिर (माजी गृहराज्य मंत्री तथा अध्यक्ष राष्ट्रीय मागास वर्गीय आयोग), आमदार करण देवतळे, भाजपा नेते कृष्णा सहारे, वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर,चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार, राजू मिश्रा सह नितीन आंबोरकर, किशोर बावनकुळे, रजत थोटे, मनोज ढवळे व अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.



