✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हापुरी(दि.1मार्च):-एज्युकेशन व मेडिकल हब म्हणून प्रसिद्धीस आलेल्या ब्रह्मपुरी शहरात नव्याने सुरू होत असलेल्या जे जे मेडिकल्स व मल्टीस्पेशालिटी क्लिनिकचे उद्घाटन दि. 30 मार्चला पार पडले. सदर क्लिनिक व मेडिकलचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती व ब्रह्मपुरी नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष तथा ने. ही. भैया शिक्षण संस्थेचे सचिव मान. अशोकजी भैया यांचे हस्ते पार पडले. याप्रसंगी शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा गोंडवाना विद्यापीठातील माजी प्राचार्य मान. देविदासजी जगनाडे, डॉ. अरविंद नाकाडे, गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सांख्यिकीय अधिकारी मान. कामेश्वरजी तलमले, लाखनी येथील सुप्रसिद्ध डेंटिस्ट डॉ. सारंग निर्वाण, व डॉ. मंजिरी निर्वाण (जेंगठे) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नागपूर रोडवरील जेंगठे कॅम्पस मध्ये सदर क्लिनिक व मेडिकल्स ची सुरुवात होत असून जाॅबलेस ग्रोथच्या कसोटीच्या काळात सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी मदत मिळावी म्हणून शैक्षणिक क्षेत्रानंतर आर्थिक व वैद्यकीय क्षेत्रात प्रा. जेंगठे सरांनी सुरू केलेल्या उपक्रमाचा हा भाग असल्याचे श्री अशोक शेंडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. तसेच अभ्यासिकेतून 30 विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी, स्वबळावर उभे केलेले पाच विद्यार्थी, तालुका स्तरावर निर्माण केलेल्या तीन नागरी पतसंस्थामधून शेकडो लोकांना अर्थसहाय्य व नव्या पतसंस्था निर्मितीचे काम असे विविध प्रयोग सदर उपक्रमाचाच भाग असल्याचे सांगितले. खरेतर मुठभर स्वार्थी भ्रष्ट लोकांमुळे सहकार क्षेत्र बदनाम झाले असले तरी देशाला सहकाराशिवाय पर्याय नसल्याने याच माध्यमातून बेरोजगार तरुणांना उद्योजक बनविण्याचा सरांचा मानस असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला
विशेष म्हणजे मागील 50 वर्षापासुन शेकडो स्थानिक लोकांना कायम रोजगार देत असलेले उद्योगपती श्री अशोक भैय्या विदर्भातील प्रमुख रोजगार निर्माते बनले असुन सामाजिक कार्यकर्त्यांची साथ मिळाल्यास ब्रह्मपुरीला एक उद्योगी जिल्हा व विदर्भातील सर्वात मोठे रोजगार निर्मिती केंद्र बनविण्याचा व हजारो स्थानिक तरुणांना रोजगार देण्याचा निर्धार आपल्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केला. पण यासाठी राजकीय नव्हे तर सामाजिक कार्यकर्त्यांनी नेतृत्व करण्याची पुर्वअट सांगितली. तसेच स्किलबेस शिक्षण देणारे खाजगी विद्यापीठ निर्माण करुन रोजगार निर्मिती सहज शक्य होईल असे सांगितले. विशेष म्हणजे प्रा. जेंगठे सरांच्या शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रातील भरीव कार्याची स्तुती करून प्रतिकसारख्या होतकरु तरुणाने सुरू केलेले मेडिकल व क्लिनिक सर्वसामान्य रुग्णांना वरदान ठरेल असा विश्वास व्यक्त केला..याप्रसंगी नागपुरातील सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची चमू बोलावून परिसरातील जनतेला सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा प्रतिक कोहळे यांनी निर्धार व्यक्त केला.
सदर कार्यक्रमात प्राचार्य शाम झाडे, प्राचार्य गिरीधरराव लडके, डॉ. सुशील चुर्हे, डॉ. पंकज लडके, डॉ. नुपूर लडके, डॉ. श्रीकांत कावळे, डॉ. समीर नाकाडे, डॉ. अतुल परशुरामकर, विनय लंजे, राजेश प्रधान, मोहीत रायपुरे, प्रा. विजय मुडे, प्रा. शेखर बन्नोरे, प्रा. मोहन वाडेकर, प्राचार्य नकटुजी सोनुले, विजय मोहुर्ले, टिकाराम शेंडे, प्रा. सोनुले, हरिश्चंद्र चोले, मारोती कोहळे, दिलीप भुरले, संदिप भुरले, ईश्वर कोहळे, श्रीनिवास कोहळे, किशोर कोठारे, दिलीप सातपुते, गोविंदा बुरांडे आदी शेकडो नागरिक सहभागी होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक श्री अशोक शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अमोल मोहुर्ले यांनी केले.



