आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकजी उईके ग्रामजयंती कार्यक्रमाला अड्याळ टेकडी येथे उपस्थित राहणार

88

✒️ रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हापुरी(दि.2एप्रिल):- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 116 वी जयंती अर्थात ग्रामजयंतीचा कार्यक्रम दिनांक 21 एप्रिल, 2025 रोज सोमवारला श्री गुरुदेव आत्मानुसंधान भू-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे आयोजित करण्यात आलेला असून त्यानिमित्ताने गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा तथा चर्चासत्र तसेच विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकजी उईके हे उपस्थित राहणार असून अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. असे भू-वैकुंठ समितीचे अध्यक्ष मोरेश्वर उईके यांनी कळविले आहे.

महाराजांच्या साक्षात पाऊल खुणा ह्या गुरुपद गुंफेत असल्यामुळे भू-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे वंदनीय महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी. असा निर्णय अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम श्री क्षेत्र मोझरी, रजि. नंबर एफ 162 संचालित श्री गुरुदेव चआत्मानुसंधान भू-वैकुंठ समिती, अड्याळ टेकडी च्या मासिक मीटिंग मध्ये घेण्यात आला. असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.