सिगारेटच्या १ रुपयांच्या वादाने, टपरीचालक व ग्राहकांची शाब्दिक शिवीगाळ

100

▪️टपरीचालकच्या मारहाणीत ग्राहकाचा मृत्यु-टपरीचालकासह मुलाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल,  

✒️नाशिक प्रतिनिधी(शांतारामभाऊ दुनबळे)

  नाशिक(दि.5एप्रिल):-नविन नाशिक सिडको परीसरातील राजे छत्रपती संभाजी स्टेडियम जवळ च्या मागील बाजूस सहाव्या स्कीम जवळील रेणुका जनरल स्टोअर्स पानटपरी वर सिगारेट घेतल्यानंतर ग्राहक व टपरीचालक यांचा १ रुपया जादा मागत असल्याने शाब्दिक शिवीगाळ रुपांतर मारहाणीत टपरीचालकाने लाकडी दांडक्यांने मारहाणीत ग्राहकाचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व मयताच्या मुलाच्या सुमित विशाल भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नविन नाशिक परीसरातील रेणुका जनरल स्टोअर्स पानटपरी येथे बुधवार दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता टपरीवर विशाल भालेराव वय वर्ष ५० राहणार पाथर्डी फाटा यांनी सिगारेट घेतली टपरीचालक बापु जगन्नाथ सोनवणे वय वर्ष ५९ रा, शिवपुरी चौक उतमनगर यांनी सिगारेट चे अकरा रुपये मागितले असता विशाल भालेराव यांनी सिगारेट दहाच रुपयांना मिळते तुम्ही १ रुपया जास्त का घेता? असे विचारल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला यात भालेराव यांनी शिवीगाळ करत टपरीवर असलेल्या वस्तू उचलून फेकण्याचा प्रयत्न केल्याने टपरीचालक सोनवणे यांनी लाकडी दांडा भालेराव यांच्या डोक्यावर मारला रक्तस्राव सुरू असताना ही भालेराव यांनी स्वताला सावरत जखमी अवस्थेत जेथे काम करत होते तेथे गेल्या वर डोक्यातील रक्तस्राव मालकाला दिसल्याने त्यांनी भालेराव यास खाजगी रुग्णालयात उपचार केले तेथे डोक्याला तीन टाके डॉक्टर घालून औषध उपचार घेवून घरी आल्यावर सायंकाळी भालेराव यास अस्वस्थ वाटू लागल्याने खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले.

प्राथमिक तपासणी नंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी भालेराव यास मृत घोषित केले शवविच्छेदन अहवालात डोक्यास मार लागल्याने मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आल्यानंतर बापु जगन्नाथ सोनवणे व त्याचा मुलगा किरण बापु सोनवणे बापलेकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला मयत विशाल भालेराव यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी भाऊ भावजयी पुतणे असा मोठा परिवार असुन परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिक शहरातील विविध परीसरात किरकोळ कारणावरून हाणामारी होते आणि तो भडका खुनापंर्यत जातो हे सञ सुरू आहे जानेवारी २०२५ पासुन ३१मार्च २०२५ या तीन महिन्याच्या कालावधीत विविध ठिकाणी तब्बल २४ खुन झाले आहे मार्च महिन्यात रंगपंचमीच्या दिवशी दोन सख्खे भावाचा खुन झाला होता अंबड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे अधिक तपास करत आहे