स्वाभिमानी जंयती उत्सव समिती वतीने येवला तालुक्यात भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती निमित्त भरगच्च कार्यक्रम

32

✒️नाशिक प्रतिनिधी(शांताराम भाऊ दुनबळे)

 नाशिक(दि.5एप्रिल):-येवला तालुका स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांच्या मार्गदर्शनानुसार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त *भव्य भिमउत्सव सोहळा* संपन्न होणार उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून विजयभाऊ घोडेराव यांची तर सचिव पदी विनोद त्रिभुवन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली

*समितीचा महत्त्वाचा निर्णय डिजे वरती खर्च करण्यापेक्षा सामाजिक उपक्रमातून प्रबोधन करणार*

*कोणतेच पावती पुस्तक किंवा वर्गणी घेतली जाणार नाही स्वता पदाधिकारी खर्च करणार*

 

*कार्यक्रमाची रूपरेषा*

शुक्रवार दि.11एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह शेजारील सभागृह येवला खासदार मा.भास्करराव भगरे सर तसेच डाॅ.संजय आपरांती साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत 134 गोर गरिब गरजू शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप तसेच गरिबीवरती मात करून आदर्श विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात येणार आहे

रविवार दि. 13 एप्रिल रोजी 11वाजता शासकीय विश्रामगृह शेजारील सभागृह येवलाभव्य कवि संमेलन होणार आहेत 

14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शहरातील विंचूर चौफुलीवरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटप करण्यात येणार आहे तसेच अनेक गावात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहे 

येवला तालुक्यातील सर्व बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन महेंद्र पगारे यांनी केले आहे

समितीचे संचालक मंडळ 

विजय घोडेराव बाळासाहेब आहेर सुरेश खळे अँड.अनिल झाल्टे विनोद त्रिभुवन अजहरभाई शेख मयुर सोनवणे विधाता आहीरे विजय पगारे गणेश झाल्टे बाळासाहेब सोनवणे दादासाहेब मोरे ऋषिकेश पगारे इलियाज पठाण प्रशांत वाघ सतोष आहिरे उत्तम आहीरे नवनाथ पगारे बाळासाहेब गायकवाड नाना पिंपळे सतीश खळे बाळासाहेब चंदन वंसत घोडेराव भिमराव खळे सौ.आशाताई आहेर सौ. अँड. स्मिताताई झाल्टे सौ.नयनाताई सोनवणे सौ.सुंनदाताई काळे सौ.ज्योतीताई पगारे सौ.लक्ष्मीताई त्रिभुवन सौ.सविता आहिरे सौ.नंदिनी पगारे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहे