

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.8एप्रिल):-चक्रवर्ती राजा अशोक सम्राट यांच्या काळात कलिंगचे युद्ध झाले लाखो सैनिक मारले गेलेरक्ताचे पाट वाहु लागले पण अशा भयाव अवस्थेत अवस्थेत तथागतांचा भिखु संघ जखमी सैनिकाला उपचार करत होता तर कोणी त्यांना पाणी पाजत होते. राजा अशोक सम्राट यांनी त्या भिकू संघाला प्रश्न केला की मी लाखो सैनिकांना मारले आहे आणि तुम्ही काय त्या सैनिकांना पाणी पाजत वाचवण्याचा प्रयत्न करत आहात उपचार करत आहात हे असे का करत आहात हे राजा तथागत भगवान बुद्ध म्हणतात मरणार अपेक्षा तारणारा केव्हाही श्रेष्ठ असतो.
तसेच सम्राट अशोकांनी आदर्श नगर रचना, रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड केली. आरोग्य वनस्पति लागवडीसाठी शेतकर्यांना प्रोत्साहित केले. दिनांक 5 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यासमोर चक्रवर्ती राजा अशोक सम्राट यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.डॉ अनिल काळबांडे बोलताना म्हणाले.
या प्रसंगी प्रा.डाॅ.एम.डी.इंगोले यांनी आपल्या आपले मनोगत व्यक्त करना- राजा बींबींसार पुत्र चक्रवर्ती सम्राट अशोकाने तत्कालीन संपूर्ण भारतावर अधिराज्य गाजवले. कलिंग युद्धांनतर तथागत बुद्धांचा विश्व शांतिचा मार्ग अंगिकारला. ह्या इर्शेपोटि रानी ‘तिक्ष्यरक्षिता’ बोधि वृक्ष समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सम्राट अशोकांनी आपला पुत्र युवराज ‘महेंद्र’ आणि युवरानी ‘संघमित्रा’ यांना धम्म प्रचार-प्रसारासाठी श्रीलंका येथे पाठवले. तद्वतच त्यांनी संपूर्ण भारततात ८०००० हजार स्तूपांची निर्मिती केली. यांचे अवशेष आज ही आम्हाला पहावयास मिळतात. सम्राट अशोकांनी आपल्या शौर्याचे प्रतीक अशोक स्तंभ उभारले. अशोक स्तंभावरील चारमुखी सिंह मुद्रा भारताच्या संविधान व चलनी नोटांवर व नाण्यांवर अंकित आहे. तसेच आज सम्राट अशोक चक्र भारताच्या राष्ट्र ध्वजवर मोठ्या दिमाखात फडकताना दिसते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक सत्यपाल साळवे ,नगरसेवक नागनाथ कासले, विशाल साळवे, सामाजिक कार्यकर्ते विलास अण्णा जंगले, वकील संघाचे अध्यक्ष मिलिंद क्षिरसागर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष पंडित पारवे, डॉ.अशोक हनवते, लक्ष्मण कांबळे, रावसाहेब मस्के, दुर्गानंद वालवंटे यावेळी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकारी वकील संघाचा पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव कांबळे, रोहिदास लांडगे, गुणवंत कांबळे, अशोक वावळे ,महाविर घोबाळे, विकास रोडे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश जोंधळे यांनी केले तर आभार शाहीर भगवान गायकवाड यांनी आपल्या शैलीत वामनदादा कर्डक यांचे गीत सादर करून मानले.



