व्यकटेश नगरात श्रीराम ची भव्य शोभा यात्रा

94

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8एप्रिल):- येथील व्येकटेश , क्रांती, गोदावरी नगर येथील नागरिकांनी दिनांक 6 श्रीराम जन्मत्सव निमित्त ग्रंथ व श्रीरामा चे प्रतिमेची पालखी मध्ये भव्य मिरवणूक शोभा यात्रा काढली. या मिरवणुकीने संपूर्ण परिसर श्रीरामा चे जय घोषणांनी दणाणून गेला होता. मिरवणुकीच्य आरंभी पारंपरिक सनई,सुर,हलगी च,राजकुमार राठोड,जयदीप फड याच्या मंडळाचे मुलींचे लेझीम पथक, ह भ प सीताबाई गुट्टे याच्या संत जनाबाई महिला मंडळाचे भजनी पथक, विनाधारी हभप अच्युत महाराज किरडे पालखी पालखी समोर राम सीता लक्ष्मण चा सजीव देखावा या रूपात ज्ञानेश नावेकर व ज्ञानदा नावेकर आणि लक्ष्मण रुपात सुरेश लेंडाळे. संकट मोचन हनुमान मंदिरापासून ढोल ताशाच्या फटाक्याच्या आतिश बाजित मिरवणूक हिचा आरंभ झाला यावेळी तिन्ही नगरातील महिला पुरुष बालगोपाळ सहभागी होऊन आनंदाने जयघोष करत होते.

यावेळी लेझीम पथक लक्षदीपक लेझीम प्रात्यक्षिके दाखविले, शोभायात्रा व्यंकटेश नगर क्रांतीनगर गोदावरी नगर मार्गे संकट मोचन हनुमान मंदिर मध्ये बारा वाजता पोहोचल्यानंतर श्रीराम जन्मोत्सव करत गुलाल पुष्प ची आरती करण्यात आली. या आरतीची यजमान कैलास फड, दिनकर नाव्हेकर,डॉ महेश शिंदे,कुबेर खांडेकर सर यांच्यासह सर्व भाविक भक्तांनी महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 

दुपारच्या सत्रामध्ये ह भ प भगवान देव पडेगावकर यांच्या वाणीतून संगीतमय भागवत कथेचा आरंभ झाला. संगीताची साथ तबलावादक गुंडेराव देशपांडे, पेटीवादक लक्ष्मण महाराज घाडगे, गायक गोविंदराव मुंडे मरगळवाडी कर, मृदंग वादक यश मुंडे यांची साथ. कार्यक्रमाची निवेदन मधुकर भारती सर यांनी केले. शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी सुरेश जाधव, सार्थक सांगळे, कृष्णागिरी, मनीष मुलगर, अर्जुन गिरी, सोहम गिरी, अब्दुल करीम, स्वराज सांगळे, अर्णव दिग्रसकर, कार्तिक भोसले, शिवांश पुरी,आदित्य जाधव, कॉलनीतील फक्त भाविक भक्तांनी परिश्रम घेतले.