✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.11एप्रिल):-शहरातील श्री संत जनाबाई महाविद्यालयात आज (दिनांक 11 एप्रिल शुक्रवार) रोजी दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत शालेय मुलींच्या संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिराचे आयोजन श्री संत जनाबाई कला वाणिज्य महाविद्यालय व फायटर्स ग्रुप स्पोर्ट्स अकॅडमी गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय मुलींसाठी संरक्षण प्रशिक्षण कराटे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी ऋषिकेश शिंदे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे,तहसीलदार उषाकिरण शृंगारे, गटशिक्षणाधिकारी भगवान ठुले असणार आहेत या प्रशिक्षण शिबिरास जास्तीत जास्त मुलींनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे



