ग्रामगीता महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विविध उपक्रम

43

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी) 

 चिमूर(दि.12एप्रिल):-ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे दिनांक 11 एप्रिल रोजी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग, शिष्यवृत्ती समिती व समान संधी केंद्र यांच्या संयुक्त वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य, डॉ. सुनंदा आस्वले व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मृणाल वऱ्हाडे, डॉ. संदीप सातव व डॉ. हुमेश्वर आनंदे उपस्थित होते.

या जयंतीचे औचित्य साधून नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच कोणत्याही प्रकारच्या नशेपासून मुक्त राहण्याकरिता प्रोत्साहित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या औचित्य साधून डॉ. मृणाल वऱ्हाडे यांनी शासनातर्फे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले विविध शिष्यवृत्ती योजना बद्दल मार्गदर्शन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणादायक जीवनावर प्रकाश टाकला व तसेच समाजाच्या वंचित वर्ग आणि स्त्रियांसाठी शिक्षण क्षेत्रात त्यांचा सर्वात मोठा योगदान आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. सरताज शेख तर आभार प्रदर्शन डॉ. सुमेध वावरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बहुसंख्येने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.