डॉ गणेश पुंडे राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्काराने सन्मानित 

152

✒️प्रतिनिधी पूणे(जगदीप वनशिव)

पुणे(दि.12एप्रिल):- राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मिडिया समूह आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये लातूर जिल्ह्यातील ग्रामीण कवी डॉ गणेश तुकाराम पुंडे यांना यावर्षीचा राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला अभिनेते महेश देवकते, सिनेअभिनेत्री मा निलोफर पठाण सिनेअभिनेत्री प्राची पालवे, प्रांजली पवार तसेच राष्ट्रीय लोकराज्य नूज मिडिया समूहाचे संपादक संयोजक मा राहुल कुदनर यांच्या समवेत महाराष्ट्रातील नामांकित मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील 34 व्यक्तिमत्वाना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ गणेश पुंडे यांच्या सामाजिक साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांना युवा आयडॉल पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

         डॉ गणेश पुंडे यांच्या कार्याची दखल आज पर्यंत विविध संस्था संघटना यांनी घेतली आहे. गणेश पुंडे यांना आतापर्यंत मानद डी लिट सह दोन मानद डॉक्टरेट अवॉर्ड याबरोबरच विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.शून्य से शिखर तक अंतर्गत दिला जाणारा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सन्मान, राष्ट्रीय गौरव रत्न पुरस्कार, राष्ट्रीय पद्मागौरव पुरस्कार, राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कार, इंडियन आयकॉन पुरस्कार, साहित्य रत्न पुरस्कार, साहित्य सेवा पुरस्कार, साहित्य साधना पुरस्कार,आंतरराष्ट्रीय छंदोगामात्या पुरस्कार, सुजन भारत पुरस्कार,अशा अनेक पुरस्काराने सन्मानित गणेश पुंडे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सलग तीन वेळा सहभाग नोंदवला आहे. विविध चॅनेल्स रेडिओ ने त्याच्या काव्याची दखल घेतली आहे. विविध वर्तमान पत्रात तथा प्रतिनिधिक काव्यासंग्रहात त्यांच्या कविता, लेख प्रकाशित झालेले आहेत.भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या नावाने दोन पोस्टल तिकीट काढून अनोखा सन्मान केला आहे. जागतिक संसदेने गणेश पुंडे यांना जागतिक संसदेचे सदस्यत्व बहाल केले आहे.

राजेश दिवटे लिखित झिरो ते हिरो या प्रेरणादायी ग्रंथात गणेश पुंडे यांचा जीवन परिचय प्रकाशित करण्यात आला आहे. एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला