लग्न समारंभ….येथे तर राक्षसांचा नंगा नाच चालू आहे…. शहरातील रस्ते जाम!

346

आता लगीन सराई आहे. लग्न तर करावेच लागेल. पण धुडगूस घालून नाही. लोकांचा रस्ता अडवून नाही. लोकांची गैरसोय करून नाही. लोकांचा शिव्याशाप घेऊन नाही.

   लग्न म्हणजे शुभ विवाह. शुभ प्रसंग. जो तो आपल्या देवी देवता दैवतांना आमंत्रण देतो. “या आमच्या पोरांना आशिर्वाद द्या. “आपले पुरोहित बोलवतो. त्यांना मोठी दक्षिणा देतो. “तुम्ही देवी, देवता, दैवतांशी बोला. मंत्र म्हणा. त्यांना प्रसन्न करा. जेणेकरून ते आमच्या वर वधूला आशिर्वाद देतील. लग्नात सुख शांती संतती प्राप्त होईल.”

    पण येथे तर उलटेच होत आहे. लग्नात डी जे असा वाजवतात कि देव देवी दैवते येतच नाहीत. आले तरी निघून जातील. अरे!..येथे तर राक्षसांचा नंगा नाच चालू आहे. कदाचित हे लग्न राक्षसांच्या मुला मुलींचे असावे.

    लग्नात गाणी पण संस्कृती ला धरून नसतात. रेतीवाला नवरा पाहिजे. म्हणजे चोर, गुन्हेगार नवरा पाहिजे. यांना चोर गुन्हेगार जावई पाहिजे. तुला पाहून मला आमदार झाल्यासारखे वाटते. या अधेड वयात तुम्हाला अजिंठा रेस्ट हाऊस मधे एन्जॉय करायचा इरादा दिसतो. माझा नवीन पोपट लागला मिठू मिठू बोलायला. नवरदेव काय पांचवीतला पोरगा आहे, त्याचा पोपट लग्नातच बोलायला लागेल. आणि नवरी डोलायला लागेल? काहीतरीच काय?

    जर राक्षसी कृत्य करीत असाल तर नक्कीच तुम्ही मातापिता राक्षस असाल. असा मला तरी संशय येतो. अशा प्रसंगात देव देवता दैवते कशाला येतील? तुमचे पुर्वज ही येणार नाहीत. ते म्हणत असतील,”औलाद बिघडली माझी.”

     मला नाही वाटत कि अशा राक्षसांच्या लग्नात सज्जन माणसांना जावेसे वाटेल. काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करतात. जर नाईलाजाने, लाजेस्तव गेले तर मुळीच थांबत नाहीत. कानात बोळे घालून येतात आणि हाय हैल्लो करून निघून जातात. काही तर लग्नात जेवणही करीत नाहीत. पोटाचे आजार खोटे नाटे सांगून आल्या पाऊले परत जातात.

   मग थांबतो कोण?..सोंगाड्या, बोंगाड्या, बेवड्या. त्याला बरे वाटते डी जे मधे ढुंगण हलवायला. महिलांसमोर अंगविक्षेप करून नाचायला. असा माणूस काय आशिर्वाद देणार? “नवरा मरो आणि मला करो!”

     आमच्या गल्लीत मला लग्नाचे आमंत्रण आले होते. मी स्विकारले. तयारी केली, जाऊ ! पण डी जे असा जोरात लावला कि मी लग्नात जाणे रद्द केले. एक दोन वेळा घरमालकाला सांगितले कि डी जे चा आवाज कमी करा. पण म्हणाले,”एक दिवस आमचाही त्रास सहन करून घ्या. तरूण पोरं आहेत. थोढी मजा करतीलच.”

   आता हा त्रास खूप वाढला आहे. गल्लीत मंडप टाकून अनेक लोक रस्ता ब्लॉक करतात. काही अडाणचोट तर कार , मोटरसायकल आडवी लावतात. जणू येथून तेथून आमच्याच बापाचे.

       शहरातील रहदारी पाहाता असा रस्ता ब्लॉक करणे चुकीचे आहे. लग्न एकाचे असले तरी इतरांचे शाळा, कॉलेज, दवाखाना, नोकरी, बाजारहाट वगैरे कामे असतात. याचा विचार करीतच नाहीत.

    शहरातील रस्ते ब्लॉक करणे अडचणीचे ठरते. म्हणून प्रत्येक कॉलनीत, प्रत्येक ले आऊट मधे ओपन स्पेस दिलेली असते. ती त्या गटातील रहिवाशांच्या हक्काची असते. तेथेच लग्न व इतर समारंभ करणे हाच हेतू असतो. म्हणून त्या ओपन स्पेस ची किंमत त्या गटातील प्लॉट घेणाऱ्यांकडून अतिरिक्त वसुल केलेली असते. ती ओपन स्पेस कोणत्याही बदमाष नगरसेवकांना देणे बदमाषी असते. जर कोणाला शाळा कॉलेज मंदिर पुतळा बनवायचा असेल तर त्याने जमीन खरेदी करून बनवले पाहिजे. सार्वजनिक जागेचा गैरवापर आणि स्थानिकांची गैरसोय करू नये. जर कोणाला विकास करायचा असेल, नंदनवन, काश्मीर, कॅलिफोर्निया बनवायचा असेल तर इतरांच्या उरावर बसून नको. असे करणारा नगरसेवक किंवा एनजीओ हरामखोर असते. तो सेवक ही नसतोच आणि एनजीओ सेवाभावी नसतेच.

      नगरपालिका असो कि ग्रामपंचायत, तेथील प्रभाग अधिकारी किंवा ग्रामसेवकांनी रस्ता अडवणूक करणाऱ्यावर कारवाई केली पाहिजे. जळगांव शहरातील किमान ३९७ ओपन स्पेस अशाच हरामखोर, नालायक, बदमाष नगरसेवकांनी हडप केलेल्या आहेत. त्यांचा वापर कमर्शियल कामासाठी करीत आहेत. आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंच ने असे अनेक नगरसेवकांना ओपन स्पेस हडप करू दिल्या नाहीत. म्हणून ते हरामखोर नगरसेवक आमच्या जनमंच वर नाराज झाले होते. बदमाषांच्या नाराजीला घाबरून ओपन स्पेस त्याच्या घशात जाऊ देऊ नये. मग तो मोदी, फडणवीस, शिंदे, ठाकरे, पवारांचा चमचा असला तरीही विरोध केलाच पाहिजे. या नेत्यांची तमा बाळगू नये. ज्या ज्या हरामखोर नगरसेवकांनी ओपन स्पेस बळकावली असेल तर नागरिकांनी त्यांची जाहीर चर्चा केली पाहिजे. हाच तो हरामखोर, चोर, बदमाष, नालायक नगरसेवक.

 ✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२