को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने जी 7 शुगरच्या सहवीज निर्मिती प्रकल्पास राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट पुरस्कार

74

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21एप्रिल):-को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने सह-विज निर्मिती क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या प्रकल्पास 2024 करिता देण्यात येणारा सर्वोच्च मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘उत्कृष्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट’ चा राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार दि.19/04/2025 रोजी पुणे येथे एका दिमाखदार सोहळयात माजी केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, मा.ना.श्री. बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य व मा.श्री. हर्षवर्धन पाटील (चेअरमन, नॅशनल फेडरेशन ऑफ को. ऑप. शुगर फैक्ट्रीज् लि.), यांच्या शुभहस्ते तसेच कारखानदारी क्षेत्रातील इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. राजेंद्रजी डोंगरे साहेब यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, हा क्षण कारखान्याचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी सर्वोच्च आनंदाचा व लाख मोलाचा असुन जी शुगरच्या ऐतिहासिक कामगिरी मध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवणारा आहे. या गौरवामुळे निश्चितच कारखान्याचे सर्व कर्मचारी यांना यापुढे देखील अधिकाधिक चांगली कामगिरी करण्याचे बळ देणारा असुन जी7 शुगरची मान कारखानदारी क्षेत्रामध्ये गर्वाने उंचावणार आहे.

तसेच सन 2022 मध्ये देखील को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतिने कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला होता व या वर्षी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे, हि उत्तरोत्तर प्रगती कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व कामगार या सर्वांचे अथक परिश्रम व कामाची चिकाटी यामुळे हे यश प्राप्त झालेले आहे. त्यामुळे सदरील पारितोषिक मिळविण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त केले. तसेच यापुढे देखील असेच सातत्य ठेवण्याची भावनिक साद घातली व को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाने जी7 शुगर लिमिटेड कारखान्याची सदरील पुरस्कारासाठी निवड केल्या बद्दल आभार व्यक्त केले.