उमरखेड तालुक्यात बाळदी या गावात ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य

208

▪️नागरिकांचे आरोग्य धोक्यात, नाल्या साफसफाईकडे ग्रामपंचायत चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष 

✒️उमरखेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

उमरखेड(दि.21एप्रिल):- तालुक्यातील बाळदी ग्रामपंचायत मध्ये नवीन सरपंच पदावर रुजू झाल्यापासून सरपंच व ग्रामसेवक डी.बी. सूर्यवंशी यांच्या कथित मनमानी कारभारामुळे बाळदीतील नागरिक त्रस्त झाले असून . त्याचा प्रत्यय मसाई वार्ड नंबर दोन, मधील परिसरातील अस्वच्छतेच्या समस्येतून येत आहे. 

मसाई वार्ड नंबर दोन, मधील परिसरातील नाल्याची चार वर्षापासून सफाई न झाल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत.तसेच त्याच वार्डात एक उपसरपंच व एक सदस्य असून राजकीय पुढाऱ्यांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसाई वार्ड नंबर दोन मधील सध्या दुर्गंधी आणि डासांनी कहर केला आहे. 

ग्रामपंचायत सफाई कामगार कर्मचारी, किंवा साफ सफाई कामगार मजूर चार वर्षापासून नाले साफसफाईसाठी फिरकलेच नसल्याने, काही संतप्त नागरिकांना स्वतः नाल्या मधील कचरा उपसावा लागत असल्याचे विदारक चित्र आहे. 

साचलेल्या कचऱ्यामुळेआणि तुंबलेल्या नाल्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून

नागरिकांना घराबाहेर बसणे ही मुश्किल झाले आहे. 

रस्त्यावर पसरलेल्या घाणीमुळे चालणेही कठीण झाले आहे. या अस्वच्छतेमुळे डेंगू मलेरिया सारखे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. बाळदी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक डी .बी सूर्यवंशी यांनी या गंभीर समस्या कडे तात्काळ लक्ष देऊन नियमित नालेसफाई व औषध फवारणी करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. नवीन सरपंच पदावर रुजू झाले.तेव्हापासून मसाई, वार्ड नंबर दोन मधील स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे . की काय , अशी शंका ही काही नागरिक व्यक्त करत आहेत .