✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जळगाव(दि.22एप्रिल):- बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी बुद्ध गया येथे दिनांक १२ फेब्रुवारी पासून बौद्ध भिक्खू आंदोलन करीत आहेत . या आंदोलनात जळगाव येथील १७ कार्यकर्ते २३ एप्रिल रोजी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत अशी माहिती साहित्यिक जयसिंग वाघ यांनी दिली .
जयसिंग वाघ यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे की , जळगाव जिल्ह्यातून १०००० सहयांचे निवेदन बिहारचे मुख्यमंत्री , भारताचे राष्ट्रपती , प्रधानमंत्री , विरोधी पक्षनेते ( लोकसभा ) यांना २१ एप्रिल रोजी पाठविण्यात आले . दिनांक २३ एप्रिल रोजी गया येथील जिल्हाधिकारी तसेच महाबोधी महाविहार समितीचे अध्यक्ष तसेच आंदोलनाचे प्रमुख भांतेजी यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदन देणार आहेत . त्यानंतर प्रत्यक्ष आंदोलन स्थळी सहभागी होणार आहेत .
जयसिंग वाघ यांचे समवेत ॲड. आनंद कोचुरे , राजुभाई मोरे , बाबुराव वाघ , दिलीप तासखेडकर , अशोक सैंदाणे , नथु अहिरे , चंद्रशेखर अहिरराव , प्रा. डॉ. सत्यजित साळवे , प्रसिद्ध गायक शरद भालेराव , रंगकर्मी उदय सपकाळे , सुभाष वाघ , डी. झेड. मोरे , डॉ. सी. यू. भालेराव , हरिश्चंद्र सोनवणे , रामभाऊ शिरसाठ , विनोद रंधे , ई. कार्यकर्ते बुद्ध गया येथील आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत .