कोमल थोरातची महसूल सहाय्यक पदी निवड

92

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.22एप्रिल):- ढवळेश्वर ता.खानापूर येथील नंदीवाले ( भटकेविमुक्त) जमातीतील कन्या कु. कोमल थोरात ही महसूल सहाय्यक पदी निवड झाली असून या समाजातून सांगली जिल्ह्यातून पहिलीच अधिकारी बनली आहे.

कु. कोमल रमेश थोरात ही भटके विमुक्त जमातीतील नंदीवाले समुहातील देशमुखवस्ती ढवळेश्वर ता.खानापुर या गावातील रहिवासी असलेली युवती आहे. अत्यन्त प्रतिकूल परिस्थितीत तिने शिक्षण घेतले 

 तिचे प्राथमिक जि.प. शाळा आणि माध्यमिक न्यू इंग्लिश स्कूल ढवळेश्वर येथे झाले.

तर महाविद्यालयीन शिक्षण बळवंत काॅलेज विटा येथे पार पडले.तीला इस्लामपूर येथील – कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीच्या वतीने मार्गदर्शन लाभले. तिने 

 सर्व विषयातून 198 गुण मिळवून महाराष्ट्र राज्य महसूल सहाय्यकपदी यश संपादन केले आहे.

अग्रणी सोशल फौंडेशन आणि सांगली जिल्हा भटके विमुक्त कल्याण च्या वतीने आणि संपूर्ण गावाच्या वतीने तिचे अभिनंदन करणेत आले एका सामान्य कुटूंबातील मुलीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.