✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.23एप्रिल):- श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूर अंतर्गत राष्ट्रसंत अभ्यास मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारानुसार निस्पृहपणे समाजात कार्य करणाऱ्या तीन मान्यवरांना उद्या दि. २४/०४/२५ सायंकाळी ७ वाजता श्रीगुरुदेव सेवाश्रम नागपूर (रमण सायन्स सेंटर जवळ)येथे ग्रामजयंती कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.
देशभक्त वामनराव गावंडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार – दै. सकाळ चे संपादक प्रमोद काळबांडे (नागपूर)यांना , राष्ट्रसंत जीवन शिक्षण पुरस्कार- निराधार, असहाय्य गरीब मुलांसाठी शिक्षणाची सोय करणारे श्री. खुशाल ढाक (टोली) यांना तर डॉ . के.जी. जयस्वाल स्मृती आरोग्य सेवा पुरस्कार – चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सेवेचे कार्य निस्पृह भावनेने करणारे डॉ. अभिलाषा राकेश गावतुरे यांना देण्यात येणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व रोख पाच हजार रुपये आहे,अशी माहिती श्री गुरुदेव सेवाश्रमाचे अध्यक्ष एड. अशोक यावले आणि अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. बाळ पदवाड यांनी एका पत्रकान्वये केलेली आहे



