सरपंच पदाची सोडत रद्द करून ओबीसी प्रवर्गाला सरपंच पदाच्या आरक्षणात स्थान द्या-राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

261

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.25एप्रिल):-तालुक्यात दिनांक 23 एप्रिलला सरपंच पदाची झालेली सोडत रद्द करून नव्याने ओबीसी प्रवर्गाला आरक्षणात स्थान मिळवून देण्यात यावे, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.

      चिमूर तालुक्यातील 92 ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण 23 एप्रिलला जाहीर करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती 30, अनुसूचित जमाती 16 व सर्वसाधारण 46 अश्या एकूण 92 जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यात ओबीसी प्रवर्गातील आरक्षण न काढता सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ओबीसी समाजाला समाविष्ट केले.

ओबीसी समाज चिमूर तालुक्यात संख्येने अधिक असतानाही एकही आरक्षण ओबीसीला देण्यात आले नाही. ही ओबीसींवर अन्यायकारक बाब आहे. त्याच मागणीसाठी ग्राम पंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या निवडणुकीत ओबीसीना आरक्षण मिळण्याबाबत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

       यावेळी रामभाऊ खडशिंगे, यामिनी कामडी, देवेंद्र मुंगले, श्रीहरी सातपुते, प्रदीप कामडी, प्रणय कारेकर, सुनील हिंगणकर, राजकुमार माथुरकर, प्रीतम वंजारी, विलास दिघोरे, कुणाल वंजारी, पिंटू धानोरकर, अक्षय वंजारी, कपिला चावरे, दुर्गा चावरे, किशोर येळने, रवींद्र गोहणे, हेमराज दांडेकर, कार्तिक लोहकरे, अनिल मेहरकुरे, राजू कुंभारे व सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.