▪️उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी. जे. करणार उद्घाटन
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.26एप्रिल):-दरवर्षी प्रमाणे यावर्षी वंदनीय गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ११६ वी जयंती अर्थात ग्रामजयंती गुरुदेव सेवा मंडळ श्रीरामपूर व ग्रामपंचायत श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य स्वरूपात साजरी होणार आहे.
ग्रामजयंती महोत्सवानिमित्त निःशुल्क सुसंस्कार शिबिर, सामुदायिक प्रार्थना, किर्तनमाला व निःशुल्क सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.३० एप्रिल रोजी ग्रामपंचायत श्रीरामपूर येथे सरपंच आशीष काळबांडे उपसरपंच सौ.संगीता पांगरकर व सदस्यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन होऊन जिल्हा सेवाधिकारी गणेश धर्माळे यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जिवन कार्यावर मार्गदर्शन होईल.या सुसंस्कार शिबीराचे उद्घाटन ०१ मे महाराष्ट्र दिनी सायंकाळी ७: ३० वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी. जे. यांच्या हस्ते करण्यात येईल अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर तर प्रमुख अतिथी पुसद पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल चेंडकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असुन या सुसंस्कार शिबीरात नेताजी केने, प्रमोद देशमुख सामुदायिक ध्यान, प्रकाश वानरे, भैय्या पद्मावार योगा-प्राणायाम,संतोष कांबळे, आदित्य बगळे,स्वसंरक्षण ज्युडो-कराटे तसेच तज्ञ मार्गदर्शक प्रा. गजानन जाधव,प्रा. नंदकुमार खैरे,शिवशंकर गरडे, यशवंत देशमुख,गजानन कवाने,निता रोकडे, वर्षा बोंपिनवार, मुक्ता काळबांडे, रंजना किन्हेकर यांचे मार्गदर्शन तर शिबिरातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ. अरुण राठोड करतील.
सायंकाळीं दररोज सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेत गुरुदेव उपासकांचे चिंतन होईल त्यानंतर ह.भ.प.ज्ञानेश्वर केसाळे महाराज, ह.भ.प.विवेक कुरुमकर महाराज, ह.भ.प.गजानन सुरकर महाराज, ह.भ.प.नामदेव गव्हाळे महाराज, ह.भ.प.अरुण सालोडकर महाराज, ह.भ.प.आकाश ताविडे महाराज, ह.भ.प.लक्ष्मणदास काळे महाराज यांचे हरिकिर्तन होइल. शुक्रवार दि.०९ मे रोजी सकाळी रामधूनद्वारे ग्रामस्वच्छता होऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जिवनचरित्र व ग्रामगितेवर आधारित परीक्षेतील प्रावीण्य प्राप्त विदयार्थी व प्रशिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार त्यानंतर आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न होईल. ह्या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.